आश्रमातील सूत कताईतून अनेकांना मिळतोय रोजगार

By Admin | Updated: June 23, 2016 01:43 IST2016-06-23T01:43:57+5:302016-06-23T01:43:57+5:30

गांधीजींनी आपल्या जीवनात सूतकताईला विशेष महत्व दिले. खादी वस्त्र नसून तो विचार, स्वावलंबन आणि

Many people get jobs from spinning yarn | आश्रमातील सूत कताईतून अनेकांना मिळतोय रोजगार

आश्रमातील सूत कताईतून अनेकांना मिळतोय रोजगार

सेवाग्राम : गांधीजींनी आपल्या जीवनात सूतकताईला विशेष महत्व दिले. खादी वस्त्र नसून तो विचार, स्वावलंबन आणि रोजगाराचे प्रमुख माध्यम मानले. यातूनच चरखा हे स्वातंत्र्याचे प्रतिक बनले. आश्रमात गांधी जयंती आणि पुण्यतिथीला अखंड सूत्रयज्ञ करून बापूंना आदरांजली वाहिली जाते. पण आश्रम व्यवस्थापकांनी अंबर चरख्याच्या माध्यमातून नियमित कताई व रोजगार निर्माण करून बापूंच्या विचारांना प्रत्यक्ष साकार करण्याचे काम सुरू केले.
आश्रम परिसरातील महादेवभाई देसाई यांच्या निवासस्थानी सूत कताई केंद्र सुरू करण्यात आले. सध्या या ठिकाणी आठ तकब्यांचे सात अंबर चरखे सुरू असून सात जणांना रोजगार प्राप्त झाला आहे. दिवसाला एक महिला ३० ते ३५ गुंड्या काढते. प्रती गुंडी चार रूपये असा दर आहे. सामान्यपणे घरची कामे संपवून एक महिला १२५ ते १५० रू. रोज सहजपणे सध्या प्राप्त करू शकत आहे.
सेवाग्राम येथे रोजगाराची अनियमितता आहे. त्यामुळे आश्रमातील सूत कताई केंद्राने सुरू केलेल्या कताई केंद्राचा महिलांना आधार आहे. तसेच बापूंच्या कार्याला पुढे नेण्याचे कामही यामुळे होत आहे. आतापर्यंत महात्मा गांधींची जयंती व पुण्यतिथीलाच सूत कताई करून त्यांचे बापूंचे व्यायचे. पण आता ३६५ दिवस सूत कताईतून बापंूचे सदैव स्मरण केल्या जाते आहे. आश्रमात येणाऱ्या पर्यटक व अभ्यासकांना सूतकताईचे महत्व व ग्रामीण अर्थशास्त्राची माहिती यामुळे मिळत आहे.(वार्ताहर)

गांधीजींच्या रचनात्मक कार्यक्रमातील एक मुख्य भाग हा कताईचा होता. खादीला १०० वर्षे पूर्ण झाली झाली आहेत. सूतकताई उपक्रमाचा विस्तार करायचा आहे. कापड तयार करून विक्रीस ठेवण्यात येणार असून यातून रोजगार निर्मिती होत आहे.
- जयवंत मठकर, अध्यक्ष, सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान.

सूतकताई नियमित सुरू असून प्रतिसाद चांगला आहे. महिलांना यातून रोजगार प्राप्त झाला आहे.
- शेरखॉँ पठाण, व्यवस्थापक, सूतकताई .

Web Title: Many people get jobs from spinning yarn

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.