घुशींनी पोखरली अनेक घरे
By Admin | Updated: November 12, 2014 22:49 IST2014-11-12T22:49:56+5:302014-11-12T22:49:56+5:30
गावात तसेच आजुबाजूच्या परिसरात दोन वर्षापूर्वी माकडांनी धुमाकुळ घातल कौलारू घरांची चाळणी केली. तो त्रास कमी होत नाही तोच आता घर पोखरत असलेल्या घुशींनी नागरिकांना हैराण करून सोडले आहे.

घुशींनी पोखरली अनेक घरे
साहूर : गावात तसेच आजुबाजूच्या परिसरात दोन वर्षापूर्वी माकडांनी धुमाकुळ घातल कौलारू घरांची चाळणी केली. तो त्रास कमी होत नाही तोच आता घर पोखरत असलेल्या घुशींनी नागरिकांना हैराण करून सोडले आहे. गावांतील असंख्य घरे घुशींनी पोखरली असून ती पडण्याच्या मार्गावर आहे.
मातीचे असो किंवा सिमेंटचे घर असो, एकदा घशीला जागा मिळाली की खालून घर पोकळ करयाला ती सुरुवात करते. त्यामुळे अनेक घरे ढासण्याच्या स्थितीत आहेत. या घुशींच्या अंगावर पिसूळ होत असतात. त्यामुळे विविध रोगांची लागण होण्याची सुद्धा भीती गावोगावी पसरली आहे.
साहूर परिसरातील अनेक गावांमध्ये दोन वर्षापासून माकडांनी घरावरची केवलू फोडून घराची चाळणी केली. तसेच घरावर वाळत असलेल्या अन्नधान्याचे मोठे नुकसान केले. गावकऱ्यांची ओरड बघून वनविभागाने माकडांना पिटाळून लावले. त्यामुळे माकडांचा हैदोस काही प्रमाणात कमी झाला. ही समस्या कमी होत नाही तोच आता घुशींनी घ्रे पोखरायला सुरुवात केली आहे. स्वस्त धान्याचे दुकान, धान्याचे गोडावून, जनावरांचे गोठे, शाळा, सरकारी इमारती किंवा घराला कुलूप लाऊन बाहेरगावी गेलेल्याची घरे पोकळ केल्याचे प्रकार वाढत आहे. एकट्या साहूर गावातच तिनशे घरे ढासळण्याच्या टप्प्यावर आहे. रात्री हैदोस घालणाऱ्या घुशी आता भरदिवसासुद्धा हैदोस घालत आहे. एक ते तीन किलो वजनाची घुस एकावेळी आठ दहा पिलांना जन्म देत असल्याने घुशींचे प्रमाणही गावात भयंकर वाढले आहे. घुशीला पकदणे सहज शक्य नसते. पिजऱ्यांतही ती सहज सापडत नाही. त्यामुळे विद्युत करंटद्वारे घूस मारण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण त्यातही अनेकांना ईजा पोहचत आहे. गावातील शंकर नांदने यांनी मासोळीच्या जाळ्यात एकावेळी सहा घुसी मारल्या. त्यामुळे सर्व जण आता तोच मार्ग अवलंबवित आहे. घुस ही गांडूळ, किडेव व धान्य खात असल्यामुळे हे खाद्य तिला बाराही महिने सहज मिळत असते. माकडांसोबत घुशीसुद्धा गावोगावच्या नागरिकांना त्रस्त करीत आहे. माकडांपुढे वनविभागाने हात टेकले आहे. आता या घुशीचा कोण बंदोबस्त करणार असा प्रश्न गावकऱ्यांना पडला आहे. घुशीला मारण्यासाठी नागरिक आपल्या अंथरुणाजवळ काड्या, दगड घेऊन झोपतात. गावोगावच्या ग्रामपंचायतीनी यावर काहीतरी तोडगा काढावा अशी गावकऱ्यांची मागणी आहे.(वार्ताहर)