वन्यजीव संवर्धनातून रोजगाराच्या अनेक संधी

By Admin | Updated: April 23, 2016 02:13 IST2016-04-23T02:13:43+5:302016-04-23T02:13:43+5:30

देशात सर्वात लहान व्याघ्र संवर्धन प्रकल्प हा बोर आहे. या अभयारण्याच्या बफर झोन क्षेत्रात १२० स्क्वेअर कि़मी. वरून दुप्पट वाढ होण्याची संधी आहे.

Many employment opportunities through wildlife conservation | वन्यजीव संवर्धनातून रोजगाराच्या अनेक संधी

वन्यजीव संवर्धनातून रोजगाराच्या अनेक संधी

किशोर रिठे : बोर व्याघ्र प्रकल्पात राष्ट्रीय जनसंपर्क परिषद
वर्धा : देशात सर्वात लहान व्याघ्र संवर्धन प्रकल्प हा बोर आहे. या अभयारण्याच्या बफर झोन क्षेत्रात १२० स्क्वेअर कि़मी. वरून दुप्पट वाढ होण्याची संधी आहे. त्यामुळे या क्षेत्रात येणाऱ्या ४४ गावांसमोरील प्रश्न दूर होण्यासाठी मदतच होणार आहे. तसेच वन्य जीव संवर्धनाच्या माध्यमातून हजारो नागरिकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार असल्याचे मत मत वन्यजीव अभ्यासह किशोर रिठे यांनी व्यक्त केले.
पब्लिक रिलेशन्स सोसायटी आॅफ इंडिया वर्धा चॅप्टरच्यावतीने राष्ट्रीय जनसंपर्क परिषदेचे आयोजन बोर व्याघ्र प्रकल्प संकुलात गुरुवारी करण्यात आले होते. ‘एक राष्ट्र एक स्वर विश्वासाचा सेतू जनसंपर्क’ या विषयावर आधारित या परिषदेत ‘वन पर्यटन आणि जनसंपर्क’ या विषयावर ते बोलत होते. यावेळी ‘बोर’ चे विभागीय वनाधिकारी एस.बी. भलावी, प्रकल्पाचे सहायक वनरक्षक उत्तम सावंत, वन परिक्षेत्र अधिकारी रूपाली भिंगारे-सावंत, चॅप्टरचे अध्यक्ष प्रा. अनिल कुमार राय, मुंबई विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी लिलाधर बन्सोड, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी विलास नांदूरकर, जानकीदेवी बजाज ग्राम विकास संस्थेचे विनेश काकडे आदींची उपस्थित होती. प्रा. अनिल कुमार राय यांनी ‘एक राष्ट्र एक स्वर : विश्वासाचा सेतू जनसंपर्क’ यावर मार्गदर्शन केले. यामध्ये त्यांनी जनसंपर्काचे महत्व, जनसंपर्क संघटनेची स्थापना, मॅकब्राईड आयोग आदी विषयांतून देशात एकता टिकविण्यासाठी सामुहिक जबाबदारी सर्वांवर असल्याचे सांगितले. देशात विविधतेत एकता असून एक राष्ट्र, एक स्वर हीच आपली शक्ती असल्याचे स्पष्ट केले.
भलावी यांनी बोर व्याघ्र प्रकल्पाबाबत माहिती देऊन येथील आजूबाजूंच्या गावांच्या सहकार्यातूनच विकास साध्य होणार असल्याचे सांगितले. प्रकल्पाच्या आजूबाजंूच्या गावांमध्ये ९५ टक्के एलपीजी गॅसची जोडणी देऊन होणारी वृक्ष कत्तल, चुलीपासून होणारे प्रदूषण, त्यापासून होणारा आजार यावर नियंत्रण होण्यास मदत झाली असल्याचे सांगितले. बोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटनात दिवसेंदिवस वाढ होत असून गावकऱ्यांनी पर्यटन विकासात सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते जनसंपर्क क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या बनसोड, नांदूरकर यांचा सत्कार करण्यात आला. संमेलनात उपस्थितांना द्वितीय व तृतीय सत्रात सावंत आणि काकडे यांनी विचार व्यक्त केले. यावेळी रातवा या वन्य संवर्धनावर आधारित संकेतस्थळाचे आणि परिषदेच्या विशेषांकाचे विमोचन करण्यात आले. यावेळी पीआरएसआय वर्धा चॅप्टरचे सचिव बी.एस. मिरगे, संजय इंगळे तिगावकर, संदीप घनोकार, इब्राहिम बक्ष, रोश लेहकपुरे, श्याम टरके, सचिन घोडे, प्रा. राजेंद्र मुढे, नंदकुमार वानखेडे, प्रवीण गावंडे, अभिजित बोडखे, आदींसह हिंदी विद्यापीठाचे विद्यार्थी उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)

नवमाध्यमांचा वापर करावा - अनिल गडेकर
समारोपीय सत्रात जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर म्हणाले, नवमाध्यमांचा वापर प्रभावीपणे शासनाच्या जनसंपर्क विभागामार्फत करण्यात येत आहे. जनसंपर्क अधिकारी यांनीही काळाची गरज ओळखून फेसबुक, टिष्ट्वटर, व्हॉट्स अ‍ॅपचा वापर करणे गरज बनल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. निसर्ग सेवा समितीचे अध्यक्ष मुरलीधर बेलखोडे, यशवंत दाते स्मृती संस्थेचे प्रदीप दाते, पक्षी अभ्यासक किशोर वानखडे यांचीही उपस्थिती होती. सहभागींना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.

Web Title: Many employment opportunities through wildlife conservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.