ई-टेंडरिंगच्या नावावर अधिकारी व कंत्राटदार करतात कामे ‘मॅनेज’

By Admin | Updated: January 20, 2015 00:10 IST2015-01-20T00:10:32+5:302015-01-20T00:10:32+5:30

जि.प. विभागात विविध योजनेत होत असलेली कामे विभागातील ठेकदार व अधिकारी मिलीभगत करून मॅनेज करीत असल्याचा आरोप वाठोडा जि.प. सर्कलचे सदस्य गजानन गावंडे यांनी केला आहे.

'Manage' works in the name of e-tendering in the name of officials and contractors | ई-टेंडरिंगच्या नावावर अधिकारी व कंत्राटदार करतात कामे ‘मॅनेज’

ई-टेंडरिंगच्या नावावर अधिकारी व कंत्राटदार करतात कामे ‘मॅनेज’

जि.प. सदस्याचा आरोप : तीन वर्षात चार कोटींची कामे
आर्वी : जि.प. विभागात विविध योजनेत होत असलेली कामे विभागातील ठेकदार व अधिकारी मिलीभगत करून मॅनेज करीत असल्याचा आरोप वाठोडा जि.प. सर्कलचे सदस्य गजानन गावंडे यांनी केला आहे. या विभागात जिल्हा परिषदेच्यावतीने तीन वर्षात चार कोटी रुपयांची कामे झाली असून त्याची आपल्याला कुठलीही माहिती नसल्याचा खुलासा त्यांनी केला.
२५/१५, ठक्करबाप्पा योजना, दलितवस्ती सुधार योजना, ग्रामीण रस्ता मार्ग, अंगणवाड्यासह आर्वी तालुक्यातील वाठोडा जि.प. सर्कलमध्ये गेल्या तीन वर्षात चार कोटींची विकास कामे केली आहे. जि.प.ची सर्व कामे मी प्रस्तावित व मंजूर करून आणत असताना बांधकाम विभागाचे संबंधीत अधिकारी कंत्राटदार इ-टेंडरिंंगची कामे मॅनेज करीत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. तालुक्यात विविध योजनेंतर्गत झालेली कामे निकृष्ट आहेत. याची माहिती देण्यास अधिकारी टाळाटाळ करीत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: 'Manage' works in the name of e-tendering in the name of officials and contractors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.