शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

चोरट्यांचे असेही धाडस; मदत मागून घरात प्रवेश केला अन् चेहऱ्यावर तिखट फेकून टीव्ही पळविला

By आनंद इंगोले | Updated: July 21, 2023 17:38 IST

स्टेशनफैल परिसरात रात्रभर खळबळ

वर्धा : मध्यरात्री गाढ झोपेत असताना अचानक घराचे बंद दार ठोठावून मदत मागितली. घरमालकाने दार उघडताच चोरट्यांनी अचानक अनधिकृतपणे घरात प्रवेश केला. त्यातील एकाचे घरातील व्यक्तीच्या चेहऱ्यावर तिखट फेकून घरातील टीव्ही लंपास केला. ही धाडसी चोरी शुक्रवारी मध्यरात्री दीड वाजतादरम्यान स्टेशन फैल परिसरात घडली. या घटनेने एकच खळबळ उडाली असून रात्रभर नागरिकांनी जागते रहो केले.

रुपेश महादेव पखाले (४०) रा. बुद्ध विहारजवळ स्टेशन फैल वर्धा. हे शुक्रवारी मध्यरात्री आपल्या घरी झोपून असताना मध्यरात्री दीड वाजता अज्ञातांनी त्यांच्या घराचे दार ठोठावले. रुपेश यांनी दार उघडण्यापूर्वी त्यांना विचारणा केली असता त्यांनी मदत पाहिजे असल्याचे सांगितले. त्यामुळे रुपशे यांनी दार उघडताच चोरट्यांनी घरात प्रवेश करुन त्यांच्याशी झटापट केली. इतकेच नाही तर एकाने रुपेश यांच्या चेहऱ्यावर तिखट फेकून घरातील अडीच हजार रुपये किंमतीचा जुना टीव्ही चोरुन नेला. या प्रकरणी रुपेश पखाले यांच्या तक्रारीवरुन शहर पोलिसांत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.

अशा चोरीची ही पहिलीच घटना

शहरामध्ये आतापर्यंत चोरी आणि दरोड्याच्या घटना घडल्या आहे. परंतु मध्यरात्री मदत मागून घरात प्रवेश करीत घरमालकाच्या चेहºयावर तिखट फेकून ऐवज पळविण्याची ही पहिलीच घटना असल्याचे सांगण्यात आले आहे. या घटनेने सर्वच भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून  या घटनेचा आढावा घेत आरोपींचा शोध सुरु केला आहे.

नागरिकांनी खबरदारी घेण्याची गरज

शहरामध्येच नाही तर जिल्ह्यात चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहे. आता मध्यरात्री किंवा भर दुपारीही  कुणीही मदतीच्या नावाखाली घरात प्रवेश करुन लुटमार करण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी अनोळखी व्यक्तीकरिता घराचे दार उघडताना खबरदारी घेण्याची गरज आहे. दार बंद असल्यावर कुणी दार ठोठावत असेल तर आधी तो व्यक्ती कोण, कशासाठी आलाय याची शहानिशा करुनच दार उघडावे. अन्यथा मदतीच्या नावाखाली घात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीwardha-acवर्धाtheftचोरी