शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

वडिलांना का मारतो म्हणत...मोठ्याने केली लहान भावाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2021 16:02 IST

वडिलांसोबत वाद घालून मारहाण करणाऱ्या लहान भावाला मोठ्या भावाने काठीने बेदम मारले. यात गंभीर जखमी झालेल्या लहान भावाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देआष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

वर्धा : वडिलांना मारहाण करण्याच्या कारणातून मोठ्या भावाने लहान भावाला काठीने बेदम मारहाण केली. यात गंभीर जखमी झालेल्या लहान भावाचा नागपूर येथील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी तिघांना अटक केली आहे. गौरव चौधरी, अशोक चौधरी, लक्ष्मी चौधरी अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

नजीकच्या बोटोणा येथील गणपत चौधरी यांची अशोक चौधरी आणि सुभाष चौधरी हे दोन्ही मुले शेजारी राहतात. २८ ऑक्टोबरला गणपत चौधरी हे मोठा मुलगा अशोक यांच्याकडे कामानिमित्त गेले असता लहान मुलगा सुभाष याने वडिलांसोबत वाद करून मारहाण सुरू केली. याप्रसंगी भांडण सोडविण्यासाठी अशोक चौधरी व त्याची पत्नी लक्ष्मी या गेल्या असता संतापलेल्या सुभाषने लक्ष्मी यांच्या हातावर काठीने प्रहार केला. ही बाब अशोक व अशोकच्या मुलाच्या निदर्शनास येताच त्यांनी सुभाष चौधरी यास बेदम मारहाण केली.

हाणामारीची माहिती मिळताच आष्टी पोलिसांनी बोटोणा गाठून जखमींना रुग्णालयाकडे रवाना केले. नागपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू असताना सुभाष याची प्राणज्योत मालवली. त्यामुळे या प्रकरणी मनुष्यवधाच्या कलमान्वये गुन्हा दाखल करून अशोक चौधरी, लक्ष्मी चौधरी, गौरव चौधरी यांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार लक्ष्मण लोकरे करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यू