भाच्याने केली मामाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 22:43 IST2019-08-29T22:42:28+5:302019-08-29T22:43:07+5:30

मामाच्या घरापासून १०० मीटर अंतरावरील फुलचंद खैरे यांच्याकडे किरायाने रुम घेतली. तेथेच ते पती-पत्नी राहू लागले. आज गुरुवारी मामा भोजराज व भाचा कमलेश यांच्यामध्ये वाद झाला. हा वाद विकोपाला जाऊन कमलेशने धारदार शस्त्राने भोजराज यांच्या पोटावर सपासप वार केल्याने जागीच मृत्यू झाला.

Mama murdered by nephew | भाच्याने केली मामाची हत्या

भाच्याने केली मामाची हत्या

ठळक मुद्देघरगुती वाद विकोपाला : पोळ्याच्या पूर्वसंध्येला घडला थरार

लोकमत न्यूज नेटवर्क
समुद्रपूर : मामा- भाच्याचा घरगुती वाद विकोपाला गेल्यामुळे भाच्याने मामावर धारदार शस्त्राने वार करुन हत्या केली. ही घटना पोळ्याच्या पूर्व संध्येला गुरुवारी वॉर्ड क्रमांक ३ मध्ये घडल्याने गावात चांगीलच खळबळ उडाली आहे.
भोजराज रामचंद्र झोडापे (४५) असे मृताचे नाव आहे. ते आपल्या परिवारासह वॉर्ड क्रमांक ३ मध्ये राहत होते. काही दिवसांपूर्वी त्यांचा भाचा कमलेश मोरे हा त्यांच्याकडे राहायला आला होता. मात्र, दोन महिन्यांपूर्वी कमलेशने नागपुरातील मुलीसोबत प्रेमविवाह केला. तिला घेऊन तो मामाकडेच १५ दिवस राहिला. त्यानंतर त्याने मामाच्या घरापासून १०० मीटर अंतरावरील फुलचंद खैरे यांच्याकडे किरायाने रुम घेतली. तेथेच ते पती-पत्नी राहू लागले. आज गुरुवारी मामा भोजराज व भाचा कमलेश यांच्यामध्ये वाद झाला. हा वाद विकोपाला जाऊन कमलेशने धारदार शस्त्राने भोजराज यांच्या पोटावर सपासप वार केल्याने जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच ठाणेदार हेमंत चांदेवार व मिलींद पारडकर आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. यावेळी श्वानपथकालाही पाचारण करण्यात आले होते.
पुढील तपास ठाणेदार चांदेवार यांच्या मार्गदर्शनात मिलिंद पराडकर,अरविंद येनूरकर,आशिष गेडाम, रवी पुरोहित, धनंजय पांडे करीत आहेत.

Web Title: Mama murdered by nephew

टॅग्स :Murderखून