सेवाग्राम ते वर्धा मुख्य रस्ता वाहतुकीसाठी योग्य करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 00:06 IST2018-06-07T00:06:46+5:302018-06-07T00:06:53+5:30
नजीकच्या वरूड वॉर्ड क्र. ५ मधील वर्धा ते सेवाग्राम मुख्य रस्त्याची दैना झाली आहे. रेल्वे स्टेशन वरूडला जोडणारा पेट्रोलपंप जवळील हा मुख्य रस्ता असून या रस्त्याने सतत वाहतूक सुरू असते. परंतु, रस्त्याची दैना झाल्याने वाहनचालकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

सेवाग्राम ते वर्धा मुख्य रस्ता वाहतुकीसाठी योग्य करा
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : नजीकच्या वरूड वॉर्ड क्र. ५ मधील वर्धा ते सेवाग्राम मुख्य रस्त्याची दैना झाली आहे. रेल्वे स्टेशन वरूडला जोडणारा पेट्रोलपंप जवळील हा मुख्य रस्ता असून या रस्त्याने सतत वाहतूक सुरू असते. परंतु, रस्त्याची दैना झाल्याने वाहनचालकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने त्याकडे लक्ष देत तात्काळ योग्य कार्यवाही करावी, अशी मागणी आहे.
याच रस्त्याने या भागातील वाहनचालक पेट्रोल, डिझेलचा वाहनात भरणा करण्यासाठी ये-जा करतात. शिवाय जिल्ह्याचे स्थळ असलेल्या वर्धा शहरात जाण्यासाठी ्रपेट्रोलपंपा जवळूनच दळण-वळणाची इतर साधने मिळत असल्याने या मार्गावर नेहमीच वर्दळ असते. परंतु, या रस्त्यावरून ये-जा करताना नागरिकांसह वाहनचालकांना तारेवरची कसरतच करावी लागत आहे. रस्त्यावरील मोठाले दगड तुडवतच या मार्गाने ये-जा करावी लागत आहे. रस्त्याच्या दैनावस्थेमुळे बहूदा या मार्गाने ये-जा करणाऱ्यांची वाहने पंक्चर होतात. परिणामी नागरिकांना आर्थिक फटकाच सहन करावा लागत आहे. या रस्त्याचे खडी करण करण्यात आले होते. परंतु, अल्पवधीतच रस्त्यावरील मोठाले दगड बाहेर निघाल्याने व ते रात्रीच्या सुमारास सहज दिसत नसल्याने मोठ्या अपघाताला निमंत्रण मिळत आहे. या समस्येकडे स्थानिक लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्याने त्याबाबतची तक्रार परिसरातील काही सुजान नागरिकांनी जिल्हा लोकशाही दिनात करीत सदर रस्त्याच्या दुरूस्तीची मागणी केली आहे. नागरिकांची समस्या लक्षात घेता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी याकडे लक्ष देत रस्त्याची दुरूस्ती करावी, अशी मागणी आहे.