‘त्या’ रस्त्याचे बांधकाम नियमानुसार करा

By Admin | Updated: September 26, 2015 02:18 IST2015-09-26T02:18:00+5:302015-09-26T02:18:00+5:30

धुनिवाले मठ परिसरातील कठाणे ले-आऊट ते भुरे-वानखेडे कॉम्प्लेक्स पर्यंतच्या रस्त्याचे बांधकाम करण्यात येत आहे.

Make that road construction rule | ‘त्या’ रस्त्याचे बांधकाम नियमानुसार करा

‘त्या’ रस्त्याचे बांधकाम नियमानुसार करा


वर्धा : धुनिवाले मठ परिसरातील कठाणे ले-आऊट ते भुरे-वानखेडे कॉम्प्लेक्स पर्यंतच्या रस्त्याचे बांधकाम करण्यात येत आहे. नगर रचनाकार यांनी प्राधिकृत केलेल्या जागेवर रस्त्याचे बांधकाम होत नसल्याने याची चौकशी करण्याची मागणी येथील रहिवाश्यांनी जिल्हाधिकारी सलील यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
या रस्त्याचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारे करण्यात येत आहे. यात नगर रचनाकार यांनी प्राधिकृत जागेवर हे बांधकाम होत नसल्याची ओरड होत आहे. ले-आऊट मधील मंजूर सर्व्हिस रोड सोडून रस्त्याचे स्थळ बदलविण्यात आल्याची बाब निवेदनात नमुद करण्यात आली आहे.
वर्धा-नागपूर मार्गावरील उत्तरेकडील बाजुस हा रस्ता बांधण्यात येत आहे. मंजूर रेखांकनानुसार कठाणे ले-आऊट परिसरात हे कामे होणे गरजेचे आहे. याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे देण्यात आली आहे. परंतु काही नागरिक आपले अतिक्रमण वाचविण्याकरिता सदर रस्ता अन्यत्र वळवित असल्याचा आरोप निवेदनातून केला. याकरिता मंजूर जागेवरुन रस्ता हलविण्यात येत आहे. याची चौकशी करण्यात येऊन मंजूर जागेवरच रस्ता बांधकाम करण्याची मागणी येथील रहिवाश्यांनी यावेळी केली.(स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Make that road construction rule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.