शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

मुलभूत आपत्कालीन सेवेचे प्रशिक्षण एमबीबीएस अभ्यासक्रमात अनिवार्य करा; केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे एमसीआयला निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 14:22 IST

भारतीय वैद्यक परिषदेने वैद्यकीय अभ्यासक्रमात आमुलाग्र बदल केले या टिप्पणीचा आधार घेत केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय आरोग्य सेवा संचालनालय दिल्लीने मुलभूत आपत्कालीन सेवेचे (बेसिक लाइफ सपोर्ट) प्रशिक्षण एमबीबीएस अभ्यासक्रमात अनिवार्य करावे, असे निर्देश एमसीआयला दिल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे अपर सचिव अमित बिश्वास यांनी दिली.

ठळक मुद्देयोग्य आपत्कालीन सेवेअभावी लाखो मृत्यू

प्रशांत हेलोंडे।आॅनलाईन लोकमतवर्धा : भारतीय वैद्यक परिषदेने वैद्यकीय अभ्यासक्रमात आमुलाग्र बदल केले या टिप्पणीचा आधार घेत केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय आरोग्य सेवा संचालनालय दिल्लीने मुलभूत आपत्कालीन सेवेचे (बेसिक लाइफ सपोर्ट) प्रशिक्षण एमबीबीएस अभ्यासक्रमात अनिवार्य करावे, असे निर्देश एमसीआयला दिल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे अपर सचिव अमित बिश्वास यांनी दिली.महात्मा गांधी वैद्यकीय महाविद्यालय न्यायवैद्यक विभागाचे प्रा.डॉ. इंद्रजीत खांडेकर यांनी मुलभूत आपत्कालीन सेवा व वैद्यकीय अभ्यासक्रमाचा खालावलेला दर्जा याचे सविस्तर वर्णन करणारा ३३ पानी अहवाल २०१३ मध्ये केंद्रीय आरोग्य मंत्रालय व राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाला कार्यवाहीसाठी पाठविला होता. त्यावेळी मानवाधिकार आयोगाने आरोग्य मंत्रालयाला या अहवालावर कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. असे असले तरी कार्यवाही मात्र झाली नाही. इतकेच नव्हे तर मुलभूत आपत्कालीन सेवा व प्राथमिक उपचार देण्यास वैद्यकीय विद्यार्थी सक्षम आहे वा नाही, हे समजून घेण्यासाठी प्रात्यक्षिक परीक्षा घ्यावी, कुठल्या विभागाने घ्यावी, कुठली पद्धत वापरावी याबाबत निर्देशही एमसीआयने आरोग्य विद्यापीठांना १९९७ पासून दिलेच नाही. यामुळे मुलभूत आपत्कालीन सेवेसाठी प्रात्यक्षिक परीक्षा न घेता देशातील वैद्यकीय महाविद्यालये वैद्यकीय विद्यार्थ्यांना सक्षम व तज्ज्ञ म्हणून घोषित करीत असल्याचे उघड झाले. या माहितीच्या आधारे सविस्तर अहवाल कार्यवाहीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व आरोग्य मंत्री जगत नड्डा यांना पाठविला होता. यावरून हे निर्देश देण्यात आल्याचेही सांगण्यात आले आहे.योग्य आपत्कालीन सेवेअभावी लाखो मृत्यूदेशातील आपत्कालीन सेवेचा खालावलेला दर्जा व एमबीबीएस डॉक्टरांकडून योग्य आपत्कालीन सेवा न मिळाल्याने होणारे लाखो मृत्यू याची कारणे शोधण्यासाठी डॉ. खांडेकर, विद्यार्थी मोहिनी नादागौडा व शुभांगी कुंवर यांनी एमसीआयकडून आरटीआय अंतर्गत माहिती घेतली. यात एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांना १९९७ पासून प्रात्यक्षिक परीक्षा व योग्य प्रशिक्षणाविना मुलभूत आपत्कालीन सेवा, कार्डीओ-पलमोनरी-रिसूसायटेशन (सीपीआर) व प्राथमिक उपचार (फर्स्ट एड) देण्यास सक्षम घोषित केले गेले. वैद्यकीय अभ्यासक्रम याबद्दल स्तब्ध असल्याचा आश्चर्यजनक खुलासाही एमसीआयने केला होता.आरोग्य मंत्रालयाच्या या निर्देशामुळे वैद्यकीय शिक्षणात आपत्कालीन सेवेच्या प्रशिक्षणाबाबत २० वर्षांपासून होत आलेली घोडचूक सुधारण्यासाठी एमसीआय लवकरच पावले उचलेल. परिणामी, मुलभूत आपत्कालीन सेवा देण्यास योग्य प्रशिक्षित व परिपक्व डॉक्टर तयार होण्यास मदत होईल.- प्रा.डॉ. इंद्रजीत खांडेकर, न्यायवैद्यक विभाग, महात्मा गांधी वैद्यकीय महाविद्यालय, सेवाग्राम.वैद्यकीय डॉक्टरांचे मुलभूत आपत्कालीन सेवेबद्दलचे कौशल्य व ज्ञान कमी आहे. बºयाच रुग्णांचे मृत्यू अप्रशिक्षित व अपरिपक्व डॉक्टरांकडून योग्य मुलभूत आपत्कालीन सेवा न मिळाल्याने होत आहे. तत्सम पुरावेही उपलब्ध आहेत.- मोहिनी नादागौडा, विद्यार्थिनी, म.गांधी वैद्यकीय महाविद्यालय, सेवाग्राम.

टॅग्स :Healthआरोग्य