चिकमोह येथे मृद आरोग्य पत्रिका वितरण व शेतकरी प्रशिक्षण

By Admin | Updated: December 13, 2015 02:16 IST2015-12-13T02:16:31+5:302015-12-13T02:16:31+5:30

मृद आरोग्य पत्रिका वितरण आणि राष्ट्रीय गळीत धान्य व तेलकाड अभियान अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम चिकमोह येथे घेण्यात आला.

Maid health magazine distribution and farmers training at Chikmooh | चिकमोह येथे मृद आरोग्य पत्रिका वितरण व शेतकरी प्रशिक्षण

चिकमोह येथे मृद आरोग्य पत्रिका वितरण व शेतकरी प्रशिक्षण

समीर कुणावार : तीन वर्षांत ७७ गावांची मृद तपासणी होणार
हिंगणघाट : मृद आरोग्य पत्रिका वितरण आणि राष्ट्रीय गळीत धान्य व तेलकाड अभियान अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम चिकमोह येथे घेण्यात आला.
कार्यक्रमाचे उद्घाटन व मृद आरोग्य पत्रिका वितरण आमदार समीर कुणावार यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच शरद उभाड तर प्रमुख पाहुणे म्हणून पं. स.सदस्य अर्चना तिमांडे उपस्थित होत्या. आ. कुणावार म्हणाले, तालुक्यातील संपूर्ण गावाची मृद तपासणी येत्या तीन वर्षात पूर्ण करण्यात येत आहे. यावर्षी ७७ गावांचे नमुने काढण्याचे काम पूर्णत्वास येत आहे. जमिनीची सुपिकता व उत्पादकता या दोन्ही बाबी पीक वाढीसाठी उपयुक्त आहेत. रासायनिक खताचा होणारा अवास्तव वापर कमी करून मृद तपासणीवर आधारित अन्नद्रव्याच्या कमतरतेनुसार खताचा संतुलित व परिणामकारक वापर करण्यासाठी शेतकऱ्यामध्ये जागृती निर्माण करणे अवश्यक आहे. प्रा. डॉ. गजानन माळवी यांनी शेतकऱ्यांना शास्त्रोक्त पद्धतीने शेती करण्यास सांगितले. चोपडे यांनी गावातील शेतकऱ्यांचा स्वयंसहाय्यता बचत गट तयार करून सामूहिक शेती करण्याबाबत मार्गदर्शन केले. उपविभागीय कृषी अधिकारी जी. डी. मोरे, यांनी शेतकऱ्यांना बाजार व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले. प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी संजय साखरे यांनी केले. आभार मंडळ कृषी अधिकारी अतुल वायसे यांनी मानले. कृषी अधिकारी मोहितकर, कृषी पर्यवेक्षक हुलके, वानखेडे, सूर्यवंशी, देशमुख, वानखेडे, कुभांरे, वाळके, डगवार, गुजरकर, नन्नावरे, हातमोडे, राऊत, देवकर यांनी सहकार्य केले.(तालुका प्रतिनिधी)

Web Title: Maid health magazine distribution and farmers training at Chikmooh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.