शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनचे वर्धा नदीत जलसमर्पण आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2019 12:56 IST

देऊरवाडा येथील वर्धा नदीच्या पात्रात महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन व शिक्षक महासंघाच्या वतीने जुनी पेन्शन योजना कार्यन्वित करण्याच्या एकमुखी मागणीला घेऊन जलसमर्पण आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देदेऊरवाडा येथील वर्धा नदीच्या पात्रात महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन व शिक्षक महासंघाच्या वतीने जुनी पेन्शन योजना कार्यन्वित करण्याच्या एकमुखी मागणीला घेऊन जलसमर्पण आंदोलन करण्यात आले. आंदोलनामध्ये वर्धा, नागपूर, अमरावती जिल्ह्यातील राज्य सरकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.१९८२ व ८४ ची जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी महराष्ट्र जुनी पेन्शन हक्क संघटनेने अनेकदा आंदोलने केली आहे.

आर्वी ( वर्धा ) - देऊरवाडा येथील वर्धा नदीच्या पात्रात महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन व शिक्षक महासंघाच्या वतीने जुनी पेन्शन योजना कार्यन्वित करण्याच्या एकमुखी मागणीला घेऊन जलसमर्पण आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये वर्धा, नागपूर, अमरावती जिल्ह्यातील राज्य सरकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाराष्ट्र शासनाने ३१ ऑक्टोबर २००५ च्या अधिसूचनेनुसार शासनाच्या सेवेत दिनांक १ नोव्हेंबर २००५ रोजी व नंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्याना म.रा.ना.से अधिनियम १९८२ व १९८४ अंतर्गत निवृत्ती वेतन योजना बंद करून पारिभाषिक अंशादाई पेन्शन योजना सुरू केली आहे.

१९८२ व ८४ ची जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी महराष्ट्र जुनी पेन्शन हक्क संघटनेने अनेकदा आंदोलने केली आहे. या आंदोलनाचे फलित म्हणून राज्य शासनाने काही घोषणा केल्या त्या हवेतच. अशा या निद्राधीन शासनाला जाग येण्या करीत प्रतिकात्मक स्वरूपाचे आंदोलन म्हणून महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शनच्या सर्व शिलेदारांनी आज वर्धा नदीच्या पात्रात समर्पण करून या निगरगट्ट शासनाला जलाभिषेक केला.

आंदोलनाची दखल घेत आर्वी विधानसभेचे आमदार अमरभाऊ काळे घटनास्थळी दाखल झाले व सर्व आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांशी त्यांनी चर्चा केली व येत्या पावसाळी अधिवेशनात जुन्या पेन्शनचा जागर हा विधानभवनात केला जाईल जेणेकरून या सरकार जाग येईल असे सूचक वक्तव्य त्यांनी उपस्थितांसमोर केले.

या आंदोलनाला महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ वर्धा व महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती वर्धा चे पदाधिकारी यांनी आवर्जून उपस्थित होते. त्यांनी आपल्या अनुज बांधवांच्या या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा दिला. आंदोलनात महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेचे राज्य प्रतिनिधी व वर्धा जिल्ह्यातील संपूर्ण पेन्शन शिलेदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

टॅग्स :agitationआंदोलनWaterपाणी