शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
4
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
5
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
6
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
7
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
8
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
9
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
10
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
11
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
12
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
13
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
14
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
15
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
16
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
19
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
20
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या

Maharashtra Election 2019 ; दिवाळीच्या थिमवर मतदान केंद्रांवर होणार मतदारांचे स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2019 6:00 AM

मतदानाचा टक्का वाढावा म्हणून जिल्हा प्रशासनातर्फे उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मतदारराजाने उत्साहाने मतदान करावे यासाठी महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत महिला बचतगटातील सदस्यांनी जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील १० मतदान केंद्रांना रांगोळ्या तसेच विविध डेकोरेटिव्ह साधनांनी सजविले आहे.

ठळक मुद्देस्वागतासाठी रांगोळ्या, पुष्प व मिठाई : मतदान केंद्रांची आकर्षक सजावट

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : लोकशाहीचा महाउत्सव २१ ऑक्टोबरला साजरा होत आहे. महाराष्ट्र विधानसभा विनडणुकीसाठी सकाळी ७ वाजतापासून मतदानास सुरुवात होणार आहे. लोकशाही बळकट करण्यासाठी अवघा महाराष्ट्र मतदान करणार आहे. मतदारांच्या स्वागतासाठी वर्धा जिल्हा मागे नसून जिल्ह्यातील ४० केंद्रांवर मतदानासाठी मतदान केंद्रावर येणाऱ्या मतदारांचे रांगोळ्या, गुलाबपुष्प व मिठाई देऊन दिवाळीच्या थिमवर स्वागत करण्यात येणार आहे.मतदानाचा टक्का वाढावा म्हणून जिल्हा प्रशासनातर्फे उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मतदारराजाने उत्साहाने मतदान करावे यासाठी महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत महिला बचतगटातील सदस्यांनी जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील १० मतदान केंद्रांना रांगोळ्या तसेच विविध डेकोरेटिव्ह साधनांनी सजविले आहे. मतदान केंद्राच्या दारावर रांगोळ्या काढण्यात आल्या आहेत. मतदान करण्यासाठी येणाºया प्रथम मतदाराचे गुलाबपुष्प व मिठाई देऊन स्वागत करण्यात येणार आहे. या नावीन्यपूर्ण उपक्रमाची जबाबदारी संचालिका स्वाती वानखेडे सांभाळत आहेत. जिल्हाधिकारी विवेक भिमनवार व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांच्या नेतृत्वात नावीन्यपूर्ण संकल्पना राबविण्यात येत असून महिला बचतगटाच्या सदस्य गणवेशात मतदारांच्या स्वागतासाठी हजर असणार आहेत. यासोबत दिव्यांग मतदार, जेष्ठ नागरिक, गरोदर महिला इत्यादींचे स्वागत होणार असून त्यांना मतदान करण्यासाठी सहाय्यक असणार आहेत. त्याचप्रमाणे चार विधासभा क्षेत्रात ६ सखी मतदान केंद्रे, ५ आदर्श मतदान केंद्र मतदारांच्या आगळ्यावेगळ्या स्वागतासाठी सज्ज असणार आहेत. सखी मतदान केंद्रे महिला अधिकारी कर्मचारीद्वारा संचालित असणार आहेत. यात पंचायत समिती सभागृह कारंजा, जिल्हा परिषद मुलींची शाळा खोली क्रमांक ७, आर्वी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक शाळा क्र.३ पुलगाव, नेताजी सुभाषचंद्र हायस्कूल नगर परिषद नवीन इमतारत पुलगाव, सेंट जॉन हायस्कूल हिंगणघाट व जिल्हा परिषद इमारत सभागृह वर्धा यांचा समावेश आहे. यावेळी दिव्यांग मतदान केंद्र ही संकल्पनासुद्धा तीन केंद्रांवर राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील चारही विधानसभा क्षेत्रात १३९ मतदान केंद्रांचे वेबकास्टिंग करण्यात येणार आहे. मतदारांना मतदान करण्यासाठी आकर्षित करणे व प्रोत्साहित करण्यासाठी नावीन्यपूर्ण कल्पना राबविल्या जात आहेत. मतदारांनी स्वागताचा स्वीकार करावा व उत्साहाने मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी, सीईओ डॉ. सचिन ओंबासे यांनी केले आहे.मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्नलोकसभा निवडणुकीत झालेली कमी मतदान लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा याकरिता विविध उपाययोजना केल्या आहेत. विविध शाळांच्या माध्यमातून मतदारांत जनजागृती, चुनावी पाठशाळा आदी उपक्रम राबविण्यात आले. मतदारांनी उत्साहाने मतदान करावे यासाठी नवनवीन संकल्पना राबविल्या जात आहेत.

टॅग्स :wardha-acवर्धा