शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

Maharashtra Election 2019 ; जिल्ह्यात ६७ नामांकनपत्र दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2019 6:00 AM

वर्धा मतदार संघात एकूण १४ उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत. यात भाजपाचे विद्यमान आमदार डॉ. पंकज भोयर, काँग्रेसचे शेखर शेंडे, वंचित बहुजन आघाडीचे अनंत उमाटे, गोंडवाना गणतंत्र पक्षाचे प्रकाश वलके, माकपच्यावतीने चंद्रभान नाखले, बहुजन समाज पार्टीच्यावतीने मनीष फुसाटे, मोहन राईकवार, अपक्ष रवींद्र कोटंबकर, नंदकिशोर बोरकर, निरज गुजर, चंद्रशेखर मडावी, सचिन पांडुुरंग राऊत, कैलास भोसे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे.

ठळक मुद्देसर्वाधिक अर्ज देवळीत : हिंगणघाटात कोठारींची बंडखोरी, देवळीत सेनेचे शक्तीप्रदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील चार विधानसभा मतदार संघात एकूण ६७ नामांकनपत्र दाखल करण्यात आले आहे. यामध्ये सर्वाधिक २२ नामांकन अर्ज देवळी विधानसभा मतदारसंघात दाखल करण्यात आले आहे. अखेरच्या दिवशी देवळी मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार आ. रणजित कांबळे तर आर्वी येथून काँग्रेसकडून आ. अमर काळे, हिंगणघाट येथे माजी आमदार प्रा. राजू तिमांडे यांनी राकाँकडून तसेच राकाँचे बंडखोर म्हणून हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अ‍ॅड. सुधीर कोठारी यांनी अर्ज दाखल केले आहे. शिवाय देवळी येथून शिवसेनेच्यावतीने समीर सुरेश देशमुख यांनी उमेदवारी अर्ज भरला.वर्धा मतदार संघात एकूण १४ उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत. यात भाजपाचे विद्यमान आमदार डॉ. पंकज भोयर, काँग्रेसचे शेखर शेंडे, वंचित बहुजन आघाडीचे अनंत उमाटे, गोंडवाना गणतंत्र पक्षाचे प्रकाश वलके, माकपच्यावतीने चंद्रभान नाखले, बहुजन समाज पार्टीच्यावतीने मनीष फुसाटे, मोहन राईकवार, अपक्ष रवींद्र कोटंबकर, नंदकिशोर बोरकर, निरज गुजर, चंद्रशेखर मडावी, सचिन पांडुुरंग राऊत, कैलास भोसे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे.आर्वी विधानसभा क्षेत्रातून एकूण १२ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहे. यात भाजपच्यावतीने माजी आमदार दादाराव केचे, काँग्रेसच्यावतीने विद्यमान आमदार अमर काळे, बसपाच्यावतीने चंद्रशेखर डोंगरे, सुनील रामदास देशमुख, युवा स्वाभिमान पक्षाच्यावतीने दिलीप पोटफोडे, वंचित बहुजन आघाडीच्यावतीने रूपचंद टोपले, संभाजी ब्रिगेडच्यावतीने संजय वानखेडे, बहुजन मुक्ती पार्टीच्यावतीने राहुल पारस तायडे तर अपक्ष म्हणून अविनाश बढीये, माधव देशमुख, विलास कैलुके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे.देवळी विधानसभा मतदार संघात एकूण २२ उमेदवारांनी अर्ज सादर केले आहे. यामध्ये काँग्रेसच्यावतीने विद्यमान आमदार रणजित कांबळे, शिवसेनेच्यावतीने समीर सुरेश देशमुख, वंचित बहुजन आघाडीच्यावतीने सिद्धार्थ डोईफोडे, बहुजन समाज पाटीच्या वतीने मोहन राईकवार, सुरेश नगराळे, बहुजन मुक्ती पाटीच्यावतीने हर्षपाल मेंढे, संभाजी ब्रिगेडच्यावतीने नितीन वानखेडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. शिवाय अपक्ष म्हणून भाजपाचे बंडखोर जिल्हाध्यक्ष राजेश बकाने, ज्ञानेश्वर निघोट, दिलीप अग्रवाल, उमेश म्हैसकर, किरण पारसे, अजय तिजारे, दिनेश शिरभाते, राजेश सावरकर, चेतन साहू, नाना उर्फ ज्ञानेश्वर ढगे, कपिल गोडघाटे, राजेंद्र बनमारे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे.तर हिंगणघाट विधानसभा मतदार संघात एकूण १९ उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र सादर केले आहे. यामध्ये भाजपाच्यावतीने विद्यमान आमदार समिर कुणावार, राकाँच्यावतीने माजी आमदार प्रा. राजू तिमांडे, शिवसेना बंडखोर म्हणून माजी आमदार तथा माजी मंत्री अशोक शिंदे, राकाँ बंडखोर म्हणून हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अ‍ॅड. सुधीर कोठारी, मनसेकडून अतुल वांदिले, बसपच्यावतीने विलास टेंभरे, वंचित बहुजन आघाडीकडून डॉ. उमेश वावरे, गोंडवाना गणतंत्र पक्षाकडून दमडू मडावी, लोकजागर पक्षाच्यावतीने मनीष नांदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. तर अपक्ष म्हणून हेमंत इसनकर, किसन व्यापारी, अश्विन तावाडे, अनिल जवादे, मंदा ठवरे, श्याम इडपवार, मनीष कांबळे, प्रशांत पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे.

टॅग्स :deoli-acदेवलीRanjit Kambaleरणजित कांबळे