महाआॅनलाईनकडून बेरोजगार युवकांची फसवणूक

By Admin | Updated: December 25, 2014 23:36 IST2014-12-25T23:36:27+5:302014-12-25T23:36:27+5:30

महाआॅनलाईन संस्थेने महा-ई-सेवा केंद्रामार्फत तालुक्यातील शेकडो बेरोजगार युवकांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. यात फसवणूक झालेल्या युवकांनी पैसे परत करण्याची मागणी केली आहे.

Mahalineline unemployed youth fraud | महाआॅनलाईनकडून बेरोजगार युवकांची फसवणूक

महाआॅनलाईनकडून बेरोजगार युवकांची फसवणूक

समुद्रपूर : महाआॅनलाईन संस्थेने महा-ई-सेवा केंद्रामार्फत तालुक्यातील शेकडो बेरोजगार युवकांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. यात फसवणूक झालेल्या युवकांनी पैसे परत करण्याची मागणी केली आहे.
महाआॅनलाईनच्या संकेतस्थळावर ‘उम्मीद रोजगार’ या मथळ्याखाली औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रशिक्षण घेतलेल्या युवकांसाठी विविध कामाचे प्रशिक्षण, नोकरीची हमी व आकर्षक वेतन, अशी जाहिरात टाकण्यात आली. तालुक्यातील विविध महा-ई-सेवा केंद्रामार्फत आयटीआयधारक युवकांची उम्मीद रोजगारासाठी ३४०० रुपये शुल्क घेऊन नोंदणी करण्यात आली. नोंदणीच्या संगणकीकृत पावत्या देण्यात आल्या. येथे नोंदणी झालेल्या युवकांना प्रशिक्षण देण्यात येईल, असे नमूद करण्यात आले होते. समुद्रपूर येथील महा-ई-सेवा केंद्र चालक चंद्रशेखर हातेकर नोंदणी झालेल्या सुमारे ६० तरुणांना घेऊन प्रशिक्षणासाठी मुंबईला गेले. तेथे प्रशिक्षणासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नसून प्रशिक्षणानंतर नोकरीची हमी घेतली जात नसल्याचे संस्थेच्या प्राचार्यांनी सांगितले. संकेत स्थळावर नमूद ट्रेड व्यतिरिक्त इतर ट्रेडचे प्रशिक्षण येथे देण्यात आले.
फसवणूक झालेल्या तरुणांनी पैसे परत मिळविण्यासाठी धावपळ सुरू केली़ यासाठी बेरोजगार संबंधित महा-ई-सेवा केेंद्रात चकरा मारत आहे़ प्रशिक्षणासाठी प्रती विद्यार्थी ३४०० रुपये महाआॅनलाईनकडून घेण्यात आले. सदर रक्कम परत करण्याची मागणी युवकांनी निवेदनातून केली़ निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी महाआॅनलाईन प्रा.लि. मुंबई यांना देण्यात आले़ फसवणूक झालेल्यांची रक्कम १६ जानेवारीपर्यंत परत मिळवून देण्याची हातेकर यांनी लेखी हमी दिली आहे.(तालुका प्रतिनिधी)

Web Title: Mahalineline unemployed youth fraud