ट्रकमालक व चालकाने महालक्ष्मी कंपनीला गंडविले

By Admin | Updated: July 30, 2015 01:56 IST2015-07-30T01:56:20+5:302015-07-30T01:56:20+5:30

देवळी येथील महालक्ष्मी कंपनीतील सळाखी दिलेल्या पत्त्यावर न पोहोचविता त्याची ट्रकमालक व चालकांनी अन्यत्र विक्री करून कंपनीला गंडविले.

Mahalaxmi Company was shocked by the truck driver and driver | ट्रकमालक व चालकाने महालक्ष्मी कंपनीला गंडविले

ट्रकमालक व चालकाने महालक्ष्मी कंपनीला गंडविले

सळाखीची अन्यत्र विक्री : तिघांवर गुन्हा दाखल
वर्धा : देवळी येथील महालक्ष्मी कंपनीतील सळाखी दिलेल्या पत्त्यावर न पोहोचविता त्याची ट्रकमालक व चालकांनी अन्यत्र विक्री करून कंपनीला गंडविले. बुधवारी उघडकीस आलेल्या या प्रकाराबाबत दिलेल्या तक्रारीवरून तिघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. यात कंपनीचे सुमारे १६ लाख ४२ हजारांचे नुकसान झाले.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीच्या मागणीनुसार महालक्ष्मी कंपनीने पी.वाय. जैन रा. साऊथ ईस्टर्न कॅरिअर प्रा.लि. गुडगाव, हरियाणा याच्या ट्रकद्वारे ४६ टन सळाखीचा (१५ लाख ४२ हजार) एका कंपनीला पुरवठा केला; पण सदर सळाखी निश्चित स्थळी पोहोचल्याच नाही. ट्रकमालक जैन याने अशोक आणि अनिल या दोन ट्रक चालकांच्या मदतीने सदर सळाखीची परस्पर विक्री करून कंपनीची फसवणूक केल्याचे समोर आहे. हा प्रकार ४ जुलै रोजी घडला. याबाबत महालक्ष्मीचे संजय सदाशिव मिश्रा यांच्या तक्रारीवरून तिघांविरूद्ध कलम ४०६ अन्वये गुन्हा दाखल केला.(शहर प्रतिनिधी)

Web Title: Mahalaxmi Company was shocked by the truck driver and driver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.