महाखादी व ग्रामोद्योग यात्रा सेवाग्राम आश्रमात दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 00:58 IST2017-12-18T00:53:57+5:302017-12-18T00:58:02+5:30

येथील महात्मा गांधी आश्रमामध्ये महाखादी व ग्रामोद्योग यात्रा दाखल झाली. यात्रेकरूंनी सायंकाळी प्रार्थनेत सहभाग घेतला होता. सर्व यात्रेकरूंचे आश्रम प्रतिष्ठानचे मंत्री प्रा. श्रीराम जाधव यांनी स्वागत केले.

Mahakadi and Gramodyog Yogat enter the Sevagram Ashram | महाखादी व ग्रामोद्योग यात्रा सेवाग्राम आश्रमात दाखल

महाखादी व ग्रामोद्योग यात्रा सेवाग्राम आश्रमात दाखल

ठळक मुद्देश्रीराम जाधव यांनी केले यात्रेकरूंचे स्वागत

लोकमत न्यूज नेटवर्क
सेवाग्राम : येथील महात्मा गांधी आश्रमामध्ये महाखादी व ग्रामोद्योग यात्रा दाखल झाली. यात्रेकरूंनी सायंकाळी प्रार्थनेत सहभाग घेतला होता. सर्व यात्रेकरूंचे आश्रम प्रतिष्ठानचे मंत्री प्रा. श्रीराम जाधव यांनी स्वागत केले.
केंद्र सरकार अंतर्गत येणाऱ्या खादी कमीशनने खादीला प्रो. आणि ग्रामोद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी महाखादी व ग्रामोद्योग यात्रेचे आयोजन केले आहे. खादी व ग्रामोद्योगाकडे बघण्याचा कल आता बदलला आहे. खादी नव्या रूपात लोकांपर्यंत पोहचत आहे. परंतु, दुसरीकडे शुद्धता, रसायन व विषमुक्तता यामुळे ग्रामोद्योगाला लोकांची पसंती मिळत आहे. मागणी वाढल्यामुळे तंत्रज्ञानात भर पडून रोजगार वाढला. यातूनच शेतकरी व ग्रामीण भागाला कामाची व आर्थिक प्रगतीची संधी प्राप्त होणार आहे. यात्रेतून आणि प्रदर्शनातून खादी व ग्रामोद्योग लोकांपर्यंत पोहचणार यासाठी लोकांनी पण खरेदीचा आग्रह धरला पाहिजे, असे प्रतिपादन प्रा. श्रीराम जाधव यांनी याप्रसंगी केले. याप्रसंगी डॉ. शिवचरण ठाकूर, नामदेव ढोले, बाबा खैरकार, सिद्धेश्वर, उंबरकर, सचिन हुडे, राज बहादुरे, आकाश लोखंडे आदींची उपस्थिती होती.

Web Title: Mahakadi and Gramodyog Yogat enter the Sevagram Ashram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.