महाबीजचे सोयाबीन बियाणे उगवलेच नाही
By Admin | Updated: July 24, 2016 00:13 IST2016-07-24T00:13:36+5:302016-07-24T00:13:36+5:30
शासनाच्यावतीने शेतकऱ्यांना अनुदानाचे बियाणे देण्यात आले. यात शासनाची एजन्सी म्हणून शेतकऱ्यांना महाबीजचे बियाणे देण्यात आले.

महाबीजचे सोयाबीन बियाणे उगवलेच नाही
२.४० लाखांचा फटका : मदतीची मागणी
हिंगणघाट : शासनाच्यावतीने शेतकऱ्यांना अनुदानाचे बियाणे देण्यात आले. यात शासनाची एजन्सी म्हणून शेतकऱ्यांना महाबीजचे बियाणे देण्यात आले. अनुदानावरील बियाणे धेत शेतकऱ्याने ते परले; पेरणीला दोन आठवडे झाले तरी ते बियाणे अंकुरलेच नाही. यामुळे पिंपळगाव येथील शेतकरी किशोर विठ्ठलर माथनकर यांना सुमारे अडीच लाख रुपयांचे नुकसान सहन करावे लागले.
माथनकर यांनी त्यांच्या शेतात महाबीजचे आठ बॅग सोयाबीन पेरले. यावेळी बियाणे कमी गेल्याने त्यांनी एका खासगी कंपनीचे बियाणे घेतले. त्यांच्या शेतात खासगी कंपनीचे बियाणे अंकुरले मात्र महाबीजचे बियाणे अंकुरलेच नाही. यामुळे शेताची मोक्का चौकशी करून कंपनीकडून मोबदला मिळावा, अशी मागणी शेतकऱ्याने केली आहे. तसे निवेदन उपविभागीय कृषी अधिकारी व कृषी अधिकारी पं.स.हिंगणघाट यांना दिले आहे.(तालुका प्रतिनिधी)
जिल्ह्यात यापूर्वीही तक्रारी
यंदाच्या खरीप हंगामात महाबीजचे बियाणे पेरणाऱ्या अनेक शेतकऱ्यांना बियाणे उगविले नसल्याने फटका बसल्याचे समोर आले आहे. या संदर्भात कृषी विभागाकडे अनेक तक्रारी आल्या असून शेतकऱ्यांकडून कार्यवाहीची मागणी करण्यात आली आहे.