मगन संग्रहालयात टकळी सूतयज्ञ

By Admin | Updated: March 1, 2015 01:31 IST2015-03-01T01:31:56+5:302015-03-01T01:31:56+5:30

महात्मा गांधी, विनोबा भावे, जे.सी. कुमारप्पा अशा अनेक महान व्यक्तिमत्त्वांच्या अस्तित्वाचे एक स्वर्णीम वलय वर्धा जिल्ह्याला प्राप्त झाले आहे.

Magnificent Museum | मगन संग्रहालयात टकळी सूतयज्ञ

मगन संग्रहालयात टकळी सूतयज्ञ

वर्धा : महात्मा गांधी, विनोबा भावे, जे.सी. कुमारप्पा अशा अनेक महान व्यक्तिमत्त्वांच्या अस्तित्वाचे एक स्वर्णीम वलय वर्धा जिल्ह्याला प्राप्त झाले आहे. महात्मा गांधीजींच्या स्वातंत्र आंदोलनात चरखा, सूत व कपडा या गोष्टींचे महत्त्वपूर्ण स्थान आहे. या बाबी विद्यार्थी जीवनात प्रत्यक्ष उतरवण्यासाठी स्थापना दिनानिमित्त मगन सग्रहालयात विद्यार्थ्यांसाठी सूत यज्ञाचे आयोजन करण्यात आले़
या सूतयज्ञामध्ये सुशील हिंमतसिंगका विद्यालय, वर्धा कन्या विद्यालय, आनंद मेघे विद्यालय बोरगाव मेघे, जगजीवनराम विद्यालय व राष्ट्रसंत तुकडोजी विद्यालयाच्या एकूण १०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला़ या विद्यार्थ्यांना नोव्हेंबर २०१४ पासून टकळीवर सूत कातण्याचे प्रशिक्षण मगन संग्रहालयाकडून देण्यात आले. महात्मा गांधींनी सूतकताईसाठी टकळी व चरखा या दोन माध्यमांचा उपयोग केला होता. यात टकळी हे साधन विद्यार्थ्यांच्या दृष्टीने सुलभ व सहज हाताळण्याजोगे असल्याने मगन संग्रहालयाकडून विद्यार्थ्यांना टकळी व पेळू उपलब्ध करून देण्यात आले होते़ एकूण १ हजार ते १५०० पेळू सर्व विद्यार्थ्यांना नियमित वितरित करण्यात आले. विद्यार्थ्यानी कातलेल्या सूताच्या एकूण ४५ ते ५० गुंडयांचा निवेदिता निलयम या संस्थेद्वारा कापड तयार करण्यात आला.
या प्रथम सत्र सूतयज्ञाचा समापन कार्यक्रम मगन संग्रहालयाच्या अध्यक्ष डॉ. विभा गुप्ता, ग्रामसेवा मंडळाचे अध्यक्ष करुणा फुटाणे पवनार, आश्रमाच्या भाविनी बहण, खल्लारकर, निवेदिता निलयमचे योगेश वाघ व विणकर महिला आदींच्या उपस्थितीत पार पडला़ यावेळी मान्यवरांच्या हस्ते सहभागी १०० विद्यार्थ्यांना खादीचा रूमाल भेट देण्यात आला. मगन संग्रहालयाने विद्यार्थ्यांसाठी राबविलेल्या उपक्रमाचे कौतुक होत आहे़ कार्यक्रमाची संकल्पना आणि आयोजन डॉ. विभा गुप्ता यांच्या मार्गदर्शनात सुषमा सोनटक्के यांनी केले़ कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाकरिता मगन संग्रहालयाच्या सर्व कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.(कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: Magnificent Museum

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.