मडावी यांची पोलीस कोठडीत रवानगी
By Admin | Updated: February 13, 2016 01:41 IST2016-02-13T01:41:31+5:302016-02-13T01:41:31+5:30
नोकरीचे आमिष देऊन आठ ते दहा जणांची लाखो रुपयाने फसवणूक करणाऱ्या कोतवाल गजानन मडावी याला सावंगी पोलिसांनी जेरबंद केले आहे.

मडावी यांची पोलीस कोठडीत रवानगी
नोकरीच्या नावावर गंडा : सुमारे १० जणांच्या फसवणुकीचा संशय
वर्धा : नोकरीचे आमिष देऊन आठ ते दहा जणांची लाखो रुपयाने फसवणूक करणाऱ्या कोतवाल गजानन मडावी याला सावंगी पोलिसांनी जेरबंद केले आहे. गजानन मडावी जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानी काम करीत होता. आरोपीला शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता त्याची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली.
नजीकच्या सालोड (हिरापूर) येथील गजानन मडावी याने नोकरीचे आमिष देऊन लाखो रुपयाने गंडा घातला. त्याच्या आमिषाला सालोड येथील आॅटोचालक विजय राऊत बळी पडला. विजय याने मडावीवर विश्वास ठेऊन नोकरी लावून देत असल्याने १ लाख ३० हजार रुपये दिले होते. बराच कालावधी लोटूनही नियुक्ती पत्र न मिळाल्याने व सदर प्रकरणी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच विजय राऊत यांनी सावंगी पोलिसात तक्रार नोंदविली. तक्रारीवरुन पोलिसांनी फसवणुकीच्या कलमान्वये गुन्हा दाखल करीत आरोपी गजानन राऊत यांना अटक केली आहे. गजानन मडावी याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला सहा दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली.(प्रतिनिधी)