खरीप पूर्व मेळाव्यात महिलांनी जाणले कमी खर्चातील शेतीचे तंत्र
By Admin | Updated: April 24, 2015 02:00 IST2015-04-24T02:00:44+5:302015-04-24T02:00:44+5:30
खरीप हंगामाची पूर्व तयारी महिला शेतकऱ्यांना करता यावी, कमी खर्चाचे तंत्र त्यांना अवगत व्यावे व शेतीसाठी लागणाऱ्या निविष्ठा कुठे उपलब्ध होवू शकतात

खरीप पूर्व मेळाव्यात महिलांनी जाणले कमी खर्चातील शेतीचे तंत्र
वर्धा : खरीप हंगामाची पूर्व तयारी महिला शेतकऱ्यांना करता यावी, कमी खर्चाचे तंत्र त्यांना अवगत व्यावे व शेतीसाठी लागणाऱ्या निविष्ठा कुठे उपलब्ध होवू शकतात याबद्दलची इत्यंभूत माहिती महिला शेतकऱ्यांना व्हावी या हेतूने खरीप पूर्व महिला शेतकरी मेळाव्याने आयोजन गाडगेबाबा मठ, कृष्णनगर वर्धा येथे करण्यात आले होते.
मेळाव्याला स्वामिनाथन फाउंडेशनचे प्रकल्प समन्वयक किशोर जगताप व प्रशांत देवकर प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. दिवसभर चाललेल्या मेळाव्यामध्ये शाश्वत शेतीच्या अठरा पद्धतीवर मार्गदर्शन करण्यात आले. मेळाव्यात महिला शेतकऱ्यांचे गट बनवून चर्चा करण्यात आली शेती विशेषज्ज्ञ प्रशांत देवकर यांनी महिलांना मार्गदर्शन केले. मेळाव्यात वर्धा तालुक्याच्या २२ गावातील २९६ महिलांनी सक्रीय सहभाग नोंदविला.
गटचर्चेतून पुढे आलेल्या मुद्यांचे सादरीकरण मंदा इंगळे आमला, चंदा मेंढे वायफड, जयश्री लोखंडे आमला, बबिता वाणी दहेगाव(मिस्कीन), विद्या दापेवार धामणगाव(वाठोडा), सरिता काळे बोदड, मीरा लाडे एकुर्ली, अनिता लोखंडे आजगा, साधना वानखेडे तळेगाव (टा.) सुनिता चौधरी सोनेगाव (स्टे.) यांनी केले. वैशाली वरकडे नेरी, शिला कुमरे लोणसावळी, चंदा कांबळे पालोती, वनिता भुतकर झाडगाव यांनी २०१४ या वर्षाचे शाश्वत शेतीतील अनुभव कथन केले.
संचालन करीत उपस्थितांचे आभार चारूशिला ठाकरे यांनी मानले. यशस्वीतेसाठी रूपाली वैद्य, अतुल नाईक, सुचिता इंगोले, सोनाली फाटे, पंकज ओंकार यांनी सहकार्य केले. याप्रसंगी वर्धा तालुका महिला शेतकरी कष्टकरी संस्था वर्धा या फेडरेशनचे उद्दीष्ट व कार्यक्रमांची माहिती किशोर जगताप यांनी दिली. ‘एकीने एक निर्भिड बना ग’ या गीताने कार्यक्रमाची सांगता झाली. परिसरातील नागरिक यावेळी उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)