वर्धा जिल्ह्यात प्रेमभंग झाल्याने प्रेमी युगुलाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 15:26 IST2019-02-20T15:26:04+5:302019-02-20T15:26:38+5:30
आई-वङिलांनी आपल्या मर्जीच्या विरोधात दुसरीकडे लग्न जुळवले व साखरपुडाही उरकल्याने टोकाचे पाऊल उचलत आकोली येथील एका प्रेमी युगुलाने विहिरीत उडी घेऊन जीव दिल्याची घटना बुधवारी उघडकीस आली.

वर्धा जिल्ह्यात प्रेमभंग झाल्याने प्रेमी युगुलाची आत्महत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: आई-वङिलांनी आपल्या मर्जीच्या विरोधात दुसरीकडे लग्न जुळवले व साखरपुडाही उरकल्याने टोकाचे पाऊल उचलत आकोली येथील एका प्रेमी युगुलाने विहिरीत उडी घेऊन जीव दिल्याची घटना बुधवारी उघडकीस आली.
आकोली येथील छगन उर्फ बंटी प्रल्हाद गिरी (२४) वर्षे व रजनी दिलीप तुमडाम (२१) रा. मदना, या दोघांचे एकमेकांवर जिवापाड प्रेम होते. त्यांनी विवाह करण्याच्या आणाभाका घेतल्या मात्र घरच्यांना यांच्यातील प्रेमाची माहिती नसल्याने दुसरीकडे लग्न जुळवून साक्षगंधसुध्दा उरकले होते.
तेव्हापासून दोघेही व्यथित होते. त्यांनी आपले दु:ख लपवून ठेवले. मंगळवारी रात्री एक वाजताच्या सुमारास घरातील मंडळी गाढ झोपेत असताना त्यांनी पुनवटकर यांच्या शेतातील विहिरीत उडी घेतली. घरच्यांनी ते गायब झाल्याचे लक्षात येताच रात्रभर त्यांचा शोध घेतला पण ते सापडले नाहीत. बुधवारी सकाळी शेतातील विहिरीत उभयतांचे मृतदेह आढळून आले. पोलीस पाटील अमित धोपटे यांनी घटनेची माहिती खरांगणा पोलिसांना दिली. ठाणेदार संतोष शेगावकर, जमादार कामङी, प्रेमराज बावणे, शिपाई मनिष मसराम हे घटनास्थळी दाखल झाले.