बुलडाण्याचा भगवान ठरला ‘स्वरांजली’चा मानकरी
By Admin | Updated: January 9, 2016 02:37 IST2016-01-09T02:37:35+5:302016-01-09T02:37:35+5:30
स्थानिक विद्या विकास कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्यावतीने प्रा. अभय बावणे यांच्या स्मृतीत ‘स्वरांजली’ ही विदर्भस्तरीय गीतगायन स्पर्धा घेण्यात आली.

बुलडाण्याचा भगवान ठरला ‘स्वरांजली’चा मानकरी
समुद्रपूर : स्थानिक विद्या विकास कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्यावतीने प्रा. अभय बावणे यांच्या स्मृतीत ‘स्वरांजली’ ही विदर्भस्तरीय गीतगायन स्पर्धा घेण्यात आली. बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा येथील अंध गायक कलाकार भगवान बाभुळकर हा प्रथम पुरस्काराचा मानकरी ठरला. तसेच नागपूरचा श्याम शिंदे हा द्वितीय तर व वर्धेची अस्मिता काणे ही तृतीय पुरस्काराची मानकरी ठरली. चतुर्थ पुरस्कार प्रवीण पेटकर याला देण्यात आला.
सदर स्पर्धेत विदर्भातील ९० गायक कलाकारांनी सहभाग घेतला होता. प्रथम निवड फेरीतून अंतिम फेरीकरिता १२ स्पर्धकांची निवड करण्यात आली. या सर्व स्पर्धकांना मान्यवरांचे हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. बक्षीस वितरण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी आमदार समीर कुणावार होते. व्यासपीठावर संस्थाध्यक्ष पांडुरंग तुळसकर, धनराज गोल्हर, किशोर दिघे, डॉ. उमेश तुळसकर, गजानन देशमुख, प्राचार्य रमेश बोभाटे, डॉ. निलेश तुळसकर, शांतीलाल गांधी, शाकीरखान पठाण, उपप्राचार्य डॉ. राजविलास कारमोरे, स्पर्धा संयोजक प्रा. किरण वैद्य व प्रा. विलास बैलमारे यांची उपस्थिती होती.
स्पर्धेचे उद्घाटन संस्था सचिव डॉ. प्रा. उमेश तुळसकर यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपीठावर नगराध्यक्ष शीला सोनारे, आरोग्य सभापती गजानन राऊत, राष्ट्रपाल कांबळे, प्रभाकर उगेमुगे, भारत सामतानी, मनीष गांधी, प्रफुल क्षीरसागर यांची उपस्थिती होती. एकाहून एक सरस गाणी यावेळी सादर करण्यात आली. त्यामुळे स्पर्धेबरोबरच श्रोत्यांना सुमधून अश्या बहारदार गीतांची मेजवानी मिळाली.
प्रास्ताविक प्रा. मेघश्याम ठाकरे यांनी केले. संचालन प्रा. मंगला खुणे व नितीन आखुज यांनी केले. उपस्थितांचे आभार राजकुमार रामटेके यांनी मानले. यशस्वीतेकरिता प्रा. मनोज कोरेकर, डॉ. राजीव कळसकर, प्रा. दशरथ महाकाळे, प्रा. विजय वानखेडे, चंद्रकांत सातपुते, डॉ. संजीव कटारे, अशोक झाडे, नितीन डगवार, प्रा. अजय मोहोड, प्रा. रत्नाकर भास्कर, प्रा. घनश्याम कदमधाड, प्रा. महेश चिव्हाणे, प्रा. रमेश निखाडे, डॉ. विना नागपूरे, डॉ. नयना शिरभाते, प्रा. आफरीश अली, डॉ. भीमशंकर नगराळे, शोभा बांगडे आदींनी सहकार्य केले.
जयंत भिरंगे, प्रा. झाडे, वासुदेव गोंधळे, प्रा. माहूरकर यांनी परीक्षकांनी भूमिका पार पाडली. नागरिकांनी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थिती होती.(तालुका प्रतिनिधी)