लोकमत ‘दीपोत्सव’चे आज लोकार्पण
By Admin | Updated: November 5, 2015 02:23 IST2015-11-05T02:23:33+5:302015-11-05T02:23:33+5:30
मराठीचा सन्मान असलेला आणि ज्याची वर्षभरापासून प्रतीक्षा असते अशा ‘लोकमत दीपोत्सव’ अकांचा लोकार्पण सोहळा

लोकमत ‘दीपोत्सव’चे आज लोकार्पण
वर्धा : मराठीचा सन्मान असलेला आणि ज्याची वर्षभरापासून प्रतीक्षा असते अशा ‘लोकमत दीपोत्सव’ अकांचा लोकार्पण सोहळा गुरुवार दि. ५ नोव्हेंबर २०१५ रोजी आयोजित करण्यात आला आहे.
स्थानिक ठाकरे मार्केट येथील लोकमत जिल्हा कार्यालयात सायंकाळी ५ वाजता हा समारंभ होईल.
या समारंभाला जिल्हा परिषद उपाध्यक्ष विलास कांबळे, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे सदस्य प्रदीप दाते, महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे कार्यकारी अध्यक्ष सुनील पाटणकर, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष लोमेश वऱ्हाडे यावेळी प्रामुख्याने उपस्थित राहातील.(शहर प्रतिनिधी)