शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रातील जनतेचा महायुतीला भक्कम आशीर्वाद, वर्धा येथील सभेआधी मोदींनी व्यक्त केला विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2019 09:50 IST

आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. वर्धा येथे पंतप्रधान मोदींची पहिली प्रचार सभा होणार आहे.

मुंबई - आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. वर्धा येथे पंतप्रधान मोदींची पहिली प्रचार सभा होणार आहे. लोकसभा निवडणुकीचं मैदान मारण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. भाजपा-शिवसेना युतीचा प्रचारही सध्या जोरात सुरू आहे. महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 8 सभा होण्याची शक्यता आहे. वर्धा येथे पहिल्या टप्प्यात म्हणजे 11 एप्रिलला मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी आज वर्धा येथे प्रचारासाठी येणार आहेत.

महाराष्ट्रात चार टप्प्यात होणाऱ्या मतदानादरम्यान प्रत्येक टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 2 सभा आयोजित करण्याचा राज्यातील भाजपा नेत्यांचा प्रयत्न आहे. येणाऱ्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुंबई येथेही जाहीर सभा होणार आहे. मुंबई येथे होणाऱ्या सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही व्यासपीठावर उपस्थित असणार असल्याची माहिती मिळत आहे. 

2014 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी यांनी पहिली सभा वर्धा येथेच घेतली होती. त्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला मोठ्या प्रमाणात यश मिळालं त्यामुळे यंदा सुद्धा राज्यातील प्रचाराचा शुभारंभ वर्धा येथून होणार आहे. वर्धा येथील जुन्या आरटीओ जवळील स्वावलंबी मैदानावर सकाळी ११ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सभेआधी नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत महाराष्ट्रातील जनता पुन्हा एकदा भाजपा-शिवसेना-आरपीआय महायुतीला भक्कम आशीर्वाद देतील असा विश्वास व्यक्त केला. 

 

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वर्धा दौऱ्यामध्ये पंतप्रधान सेवाग्रामला भेट देणार की नाही याबाबत प्रश्नचिन्ह आहे. महात्मा गांधी यांची  कर्मभूमी म्हणून वर्धा देशात प्रसिद्ध आहे. वर्धा लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडून प्रदेश महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष ॲड. चारुलता टोकस यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यांच्या आई दिवंगत प्रभा राव या काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या होत्या.

मागील निवडणुकीतही विद्यमान भाजपाचे खासदार रामदास तडस यांच्या प्रचाराकरिता नरेंद्र मोदी यांनी सभा घेतली होती. या निवडणुकीच्या अनुषंगाने मतदारसंघात पूर्ण तयारी झाली असून, प्रचाराकरिता ५० हजारपेक्षा अधिक कार्यकर्ते येणार असल्याचं भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकwardha-pcवर्धाBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी