शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019; राष्ट्रवादीच्या बंडाने काँग्रेस उमेदवाराची दमछाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 22:21 IST

लोकसभा मतदारसंघात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवार अ‍ॅड. चारुलता खजानसिंग टोकस यांच्या प्रचाराने अद्याप वेग घेतलेला नाही. त्यांच्या प्रचारातून राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी अंग काढून घेतले आहे.

ठळक मुद्देप्रचाराची रणधुमाळी । काँग्रेसचे सद्भावना भवन बंदच

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : लोकसभा मतदारसंघात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवार अ‍ॅड. चारुलता खजानसिंग टोकस यांच्या प्रचाराने अद्याप वेग घेतलेला नाही. त्यांच्या प्रचारातून राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी अंग काढून घेतले आहे. तर रायुकाँचे प्रदेश उपाध्यक्ष समीर देशमुख आणि त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या प्रचारावर जाहीर बहिष्कारच टाकला असल्याने अ‍ॅड. टोकस कमालीच्या अडचणीत आल्या आहेत. रिपाइंचे कार्यकर्तेसुद्धा अशीच भूमिका घेऊन असल्याचे त्यांच्याच नेत्यांनी जाहीरपणे सांगितले आहे.अ‍ॅड. चारूलता टोकस यांनी निवडणुकीच्या तोंडावर रामनगरात सर्कस मैदानजवळ राठी यांचा बंगला भाडे तत्त्वावर घेतला आहे. तेथूनच त्यांच्या प्रचाराची सुरुवात होते. यांच्यासमवेत पक्षाचा एकही ज्येष्ठ नेता सोबत असल्याचे दिसत नाही. गेल्या अनेक वर्षांपासून ज्या सद्भावना भवनातून काँग्रेसच्या प्रचाराची सुरुवात होत होती, ते सद्भावना भवन प्रचाराच्या रणधुमाळीत यंदा बंद राहात असल्याचे दिसून आले. गटागटांत विखुरलेल्या काँग्रेसच्या अनेक नेत्यांचे मनोमिलन अजून झालेले नाही. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची नाराजी टोकस यांच्यासाठी अडचणीची ठरत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार प्रा. सुरेश देशमुख यांचे चिरंजीव समीर देशमुख लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक होते. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हा मतदारसंघ आपल्या कोेट्यात घ्यावा याकरिता बरेच प्रयत्न केले. त्यांच्या बुटीवाड्यात राकाँ नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची बैठक झाली. शिवाय आपल्या भावना पक्षाच्या नेत्यांना कळविल्या. मात्र, हा मतदारसंघ काँग्रेसच्या कोट्यातच ठेवण्यात आला. त्यांची प्रखर नाराजी राकाँच्या दुसऱ्या फळीतील नेत्यांमध्ये दिसून येत आहे. तरूण नेते काँग्रेसच्या प्रचारावर बहिष्कारच टाकून आहेत. बाहेरून येऊन उमेदवारी आमच्यावर लादली जाते. आम्ही वर्षानुवर्षे आंदोलन करतो शिवाय काँग्रेस आमच्या बळावर निवडून येते. हे आता चालणार नाही, असा निर्वाणीचा इशाराच राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवा नेत्याने काँग्रेस उमेदवाराला दिला असल्याची माहिती पक्षाच्या वर्तुळातून दिली जात आहे. मध्यंतरीच्या काळात राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शरद पवार यांना हा मतदारसंघ स्वाभिमानला देण्यासाठीही गळ घातली होती; पण अ‍ॅड. टोकस यांना उमेदवारी खेचून आणण्यात यश आले. आता राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी चारुलता टोकस यांच्या प्रचारातून अंग काढून घेतले आहे. त्यामुळे प्रचाराची धुरा स्वत: सांभाळावी लागत असून काँग्रेसचे संपूर्ण सहकार्य दिसत नाही.काय आहे राकाँ नेत्यांच्या नाराजीचे कारणवर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता होती. ही सत्ता असताना ही बँक डबघाईस आली. त्यावेळी राज्यात सत्तेवर असलेल्या आघाडी सरकारने बँकेला मदत केली नाही. त्यावेळी पालकमंत्री असलेले रणजित कांबळे त्याला कारणीभूत आहेत, असा राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांचा समज आहे. त्यामुळे रणजित कांबळे यांच्यावर नाराज अनेक नेते या निवडणुकीत काँग्रेसमुक्त जिल्ह्याचे स्वप्न पाहत आहेत. काँग्रेसचे टोकस-कांबळे घरी बसल्याशिवाय आपले काही महत्त्व वाढणार नाही, असे मानणारे अनेक लोक काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांत सक्रिय आहेत. त्यामुळे तार्इंना असहकार केल्याशिवाय आपले काही राजकारण जमणार नाही, याची जाणीव झालेले राष्ट्रवादीचे नेते आता या निवडणुकीत शरीराने सोबत असले तरी मनाने ते नागपूरच्या ‘महाल’शी जोडले गेले आहे. त्यामुळे काँग्रेस उमेदवार चारुलता टोकस कमालीच्या अडचणीत आल्या आहेत. म्हणूनच त्यांना प्रचारासाठी आपल्या नातेवाईकांना वर्र्ध्यात पाचारण करण्याची वेळ आली आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकcongressकाँग्रेस