शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
2
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
3
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
4
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
5
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
6
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
7
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
8
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
9
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
10
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
11
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...
12
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
13
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
14
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
15
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
16
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
17
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
18
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
19
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
20
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल

Lok Sabha Election 2019; नियमित कर्ज भरणाऱ्यांवर अन्यायच झाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2019 11:26 PM

राज्यसरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. या कर्जमाफीत कर्ज थकीत ठेवणाऱ्यांना मोठी रक्कम माफ झाली. मात्र जे लोक प्रामाणिकपणे नियमित कर्ज भरतात, त्यांच्यावर अन्यायच झाला. नियमित कर्ज भरणाऱ्यांना केवळ २५ हजारांचे अनुदान देण्यात आले.

ठळक मुद्देपुलगाव ते चांदुर(रेल्वे) 4० किमी

देवकांत चिचाटे।लोकमत न्यूज नेटवर्कनाचणगाव : राज्यसरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. या कर्जमाफीत कर्ज थकीत ठेवणाऱ्यांना मोठी रक्कम माफ झाली. मात्र जे लोक प्रामाणिकपणे नियमित कर्ज भरतात, त्यांच्यावर अन्यायच झाला. नियमित कर्ज भरणाऱ्यांना केवळ २५ हजारांचे अनुदान देण्यात आले. नियमित कर्ज भरणे हे पाप झाले, अशी भावना बसमधील प्रवासी शेतकऱ्यांनी मंगळवारी व्यक्त केली.पुलगाव बसस्थानकावरून लोकमतच्या प्रतिनिधीने वर्धा-जालना या बसमध्ये आपला प्रवास सुरू केला. यावेळी प्रवासादरम्यान अनेक प्रवाशांनी आपल्या व्यथा सांगितल्या. वर्धा ते पुलगाव रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय आहे. या रस्त्याच्या कामाकडे दुर्लक्ष झाले आहे. पुलगाव येथील येवढ्या मोठ्या गावात मागील दहा-पंधरा वर्षांपासून स्मशानभूमीचा प्रश्न सुटलेला नाही. पुलगाव येथील उड्डाण पुलाचा प्रश्नही प्रलंबित आहे. पुलगाव ते चांदुर (रेल्वे) या प्रवासादरम्यान किसना वरठी या धामणगाव तालुक्यातील शेतमजूराने सर्वसामान्यांच्या प्रश्नाकडे शासनाचे दुर्लक्ष झाले, अशी भावना व्यक्त केली. आमला विश्वेश्वर येथील नागरिकाने कर्जमाफीचा लाभ झाला. मात्र शेतकऱ्यांची संख्या फार कमी आहे. परंतु बऱ्याच जणांना फायदा झाला नाही, अशी माहिती दिली. काही महिला प्रवाशांनी निराधाराचे पैसे वेळेवर मिळत नसल्याचे सांगितले.सुविधांकडे दुर्लक्षसरकारने शहर व तालुक्याच्या गावात सुविधा दिल्या. मात्र खेड्यांकडे दुर्लक्ष आहे, असे सांगितले. पुलगाव, नाचणगाव, गुंजखेडा एकाच फिल्टर प्लॅन्टवर पाणी वितरण आहे. पाणी समस्या सध्या निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्याचे नळही वेळेवर येत नाही, अशी माहिती दिली.पुलगाव रेल्वे स्थानकावर सर्व गाड्या थांबत नाही. अनेक गाड्या येथून निघून जातात. पुलगाव मोठे गाव आहे. रेल्वेला थांबा द्यायला हवा, अशीही मागणी प्रवाशांनी केली.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकwardha-pcवर्धाMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019