लॉकडाऊन; गांधी आश्रम बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2020 05:00 IST2020-04-07T05:00:00+5:302020-04-07T05:00:15+5:30

आश्रम पाहायला दिवसाला ८०० ते १००० पर्यटक येत असे; पण लॉकडाऊनमुळे आश्रमात कुणीही पर्यटक नसल्याने सर्वत्र निरव शांतता पसरलेली आहे. मात्र , आश्रमातील दैनिक स्वच्छतेची कार्य सुरक्षित अंतर ठेवून करण्यात येत आहे. आश्रमातील शांतता आणि स्वच्छता हे वैशिष्ट्य मानावे लागेल. जे बंदमध्येदेखील कायम सुरू आहे.

Lockdown; Gandhi Ashram closed | लॉकडाऊन; गांधी आश्रम बंद

लॉकडाऊन; गांधी आश्रम बंद

ठळक मुद्देइतिहासातील पहिलीच घटना : दैनंदिन प्रार्थना, स्वच्छता आदी कामे सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क
सेवाग्राम : ऐतिहासिक महात्मा गांधीजींचे आश्रम कोरोना विषाणूच्या प्रादुभार्वामुळे २१ दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये पर्यटकांसाठी बंद करण्यात आले आहे. आश्रमाच्या इतिहासातील प्रथमच अशी घटना घडल्याची नोंद झालेली आहे.
जगासमोर गांधीजींच्या वास्तव्य आणि कार्यामुुळे सेवाग्राम पुण्यभूमी ठरले आहे. आश्रम कार्यकर्त्यांनी सदैव गजबजले होते. स्वातंत्र्य चळवळ आणि रचनात्मक कार्याचे जन्मस्थान होते. गांधींसह अनेक महान व्यक्तींचे तब्बल १० वर्षे वास्तव्य आश्रमात राहिले होते.
आश्रम पाहायला दिवसाला ८०० ते १००० पर्यटक येत असे; पण लॉकडाऊनमुळे आश्रमात कुणीही पर्यटक नसल्याने सर्वत्र निरव शांतता पसरलेली आहे. मात्र , आश्रमातील दैनिक स्वच्छतेची कार्य सुरक्षित अंतर ठेवून करण्यात येत आहे. आश्रमातील शांतता आणि स्वच्छता हे वैशिष्ट्य मानावे लागेल. जे बंदमध्येदेखील कायम सुरू आहे. सकाळ आणि सांयकाळची प्रार्थना सुरू आहे. गोशाळा आणि शेतातील जनावरांची देखभाल संबंधित विभागाचे कार्यकर्ते चांगल्या प्रकारे करीत आहेत.
चरखा, ग्रामोद्योग, विक्री आदी विभाग बंद ठेवण्यात आलेले आहेत. जगासाठी प्रेरणास्थान असलेले बापूंच्या आश्रमला लॉकडाऊनमुळे बंद ठेवावे लागले, ही घटना इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वाची ठरलेली आहे. नव्या व जुन्या पिढीसाठी ही महत्वाचीच घटना म्हणावी लागेल.

जगावर कोरोना विषाणूचे संकट असल्याने लॉकडाऊनची घोषणा करण्यात आल्याने आश्रम पर्यटकांसाठी बंद करण्यात आलेले आहे. आश्रमातील महत्त्वाची दैनिक कामे मात्र सुरू आहेत. इतिहासात आश्रम प्रथमच बंद करण्यात आलेला आहे. पुढील सूचना येईपर्यंत प्रवेशद्वार बंद राहील तसेच क्वारंटायीनसाठी प्रतिष्ठानने यात्री निवास मधील १६ खोल्या उपलब्ध करून दिल्या असून आवश्यक ते सहकार्य राहील.
-टी.आर.एन.प्रभू, अध्यक्ष, आश्रम प्रतिष्ठान, सेवाग्राम
 

Web Title: Lockdown; Gandhi Ashram closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.