शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊन इफेक्ट; पोलिसांकडून आरोपींना पोलीस कोठडीऐवजी कारागृहात पाठवण्यावर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 17:59 IST

लॉकअपमध्ये असलेल्या आरोपींना जेवणच मिळत नसल्याने पोलिसांपुढेही पेच निर्माण झाला आहे. परिणामी, पोलिसांकडून न्यायालयात आरोपीची पोलीस कोठडी मागण्याऐवजी त्यांना कारागृहात पाठविण्यावरच अधिक भर दिला जात असल्याचे दोन महिन्यांच्या कालावधीत दिसून आले आहे.

ठळक मुद्देहॉटेल्स, खानावळी बंद असल्याने आरोपींची खुराकही लॉक

राजेश सोळंकी।

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : कोरोना संकटकाळात सर्व नागरिक घरी बसले आहे. लॉकडाऊनमुळे अनेकांचे व्यवसाय ठप्प पडले आहेत. मात्र, जेवणावळी, हॉटेल्स बंद असल्याने याचा फटका लॉकअपमध्ये असलेल्या आरोपींनाही बसत आहे. लॉकअपमध्ये असलेल्या आरोपींना जेवणच मिळत नसल्याने पोलिसांपुढेही पेच निर्माण झाला आहे. परिणामी, पोलिसांकडून न्यायालयात आरोपीची पोलीस कोठडी मागण्याऐवजी त्यांना कारागृहात पाठविण्यावरच अधिक भर दिला जात असल्याचे दोन महिन्यांच्या कालावधीत दिसून आले आहे.कोरोना विषाणू संक्रमणाचा फैलाव रोखण्यासाठी पोलीस विभागही रस्त्यावर उतरलेला दिसून येत आहे. एरव्ही गंभीर गुन्ह्यांचा तपास करणारे आणि आरोपींना कठोर शिक्षेची मागणी करणारे पोलीसदादा आता नागरिकांमध्ये जनजागृती करताना दिसून येत आहेत. एखादी घटना घडल्यास आरोपींचा मागोवा घेत त्यांना अटक करून त्यांच्याकडून अधिक माहिती मिळविण्यासाठी न्यायालयात तपास अधिकारी आरोपीच्या पोलीस कोठडीची मागणी करीत होते. मात्र, सद्यस्थितीत कोरोनाचे संक्रमण पाहता आणि लॉकडाऊनमध्ये जेवणावळी आणि हॉटेल्स बंद असल्याचे पाहून आरोपीला जेवण कोण देणार, याच विवंचनेत पोलीस बांधव असून परिणामी, त्यांच्याकडून न्यायालयात आरोपींच्या पोलीस कोठडीऐवजी त्यांना कारागृहात पाठविण्याची मागणी करताना दिसत आहेत.लॉकडाऊन असल्याने गंभीर गुन्ह्यांच्या घटनांत कमालीची घट झाल्याचे दिसून येत आहे. मागील दोन ते तीन महिन्यांपासून किरकोळ घटना सोडल्या तर सर्वत्र शांततेचे वातावरण आहे. मात्र, काही घटनेत अटक केलेल्या आरोपीला जेवण कोण देणार? असा प्रश्न पोलिसांसमोर निर्माण झाला आहे.कोणत्याही गुन्ह्यांत आरोपींना अटक केल्यावर त्या घटनेचा तपास पूर्ण करण्यासाठी पोलीस न्यायालयाकडे आरोपींची पोलीस कोठडी मागतात. न्यायालयाने पोलीस कोठडी मंजूर केल्यावर आरोपी पोलीस कोठडीत असेपर्यंत त्याच्या दोनवेळच्या जेवणाची संपूर्ण व्यवस्था पोलिसांनाच करावी लागते. कोठडीत असलेल्या आरोपींसाठी एखाद्या खानावळ किंवा हॉटेलमधून त्यांच्यासाठी जेवणाचा डबा बोलाविण्यात येत असतो. पण, सध्या लॉकडाऊनच्या काळात हॉटेल्स, खानावळी बंद असल्याने पोलिसांपुढे पेच निर्माण झाल्याचे चित्र आहे. तसेच आता कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने पोलीसदादा अहोरात्र सेवा देत आहेत. या आणीबाणीच्या काळात मात्र, आरोपींची गुन्हेगारी प्रवृत्तीही कमी होऊ लागल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पोलिसांकडून आता आरोपीच्या पोलीस कोठडीऐवजी त्यांना कारागृहात पाठविण्याची मागणी न्यायालयापुढे करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे.

कडाऊन असल्याने मागील दोन ते तीन महिन्यांपासून जिल्ह्यात गंभीर गुन्ह्यांच्या घटनांत घट झाली आहे. किरकोळ घटनांतील आरोपींना जामीन देण्याचे उच्च न्यायालयाचेच निर्देश आहेत. सात वर्षांपेक्षा कमी शिक्षा झालेल्यांना पॅरोलवर सोडण्याचा निर्णय झाला आहे. केवळ गंभीर गुन्ह्यातच आरोपींची पोलीस कोठडी मागण्यात येत असून किरकोळ गुन्ह्यांतील आरोपींची जामिनावर सुटका करण्यात येत आहे.- विनय घुडे, शासकीय अभियोक्ता, जिल्हा व सत्र न्यायालय, वर्धा. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPoliceपोलिस