दोन निलगार्इंना जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 00:53 IST2017-10-26T00:53:08+5:302017-10-26T00:53:19+5:30

सोनोरा (ढोक) येथील शेतकरी पुरुषोत्तम बोंधाडे यांच्या शेतातील कोरड्या विहिरीत दोन निलगाई पडल्या. याची माहिती वर्धा वनविभागाला देण्यात आली.

Lives of two Nilgaiians | दोन निलगार्इंना जीवदान

दोन निलगार्इंना जीवदान

ठळक मुद्देपिपल्स फॉर अ‍ॅनिमल्सचे सहकार्य

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : सोनोरा (ढोक) येथील शेतकरी पुरुषोत्तम बोंधाडे यांच्या शेतातील कोरड्या विहिरीत दोन निलगाई पडल्या. याची माहिती वर्धा वनविभागाला देण्यात आली. माहिती मिळताच पिपल्स फॉर अ‍ॅनिमल्स व वन अधिकाºयाची चमू घटनास्थळी दाखल झाली. निलगाईला अथक प्रयत्नाने विहरीबाहेर काढुन जीवदान दिले.
दोन्ही नीलगाय या नर होत्या. शिवाय धारदार शिंग असल्याने विहिरीतून बाहेर काढणे कठीण होते. या नीलगायीचे वजन २०० किलो असल्याने जेसीबीला पाचारण करण्यात आले. जेसीबीच्या सहाय्याने पीपल फॉर अ‍ॅनिमल्सच्या कार्यकर्त्यांनी विहिरीत उतरुन सहा तासांच्या प्रयत्नानंतर निलगाईला सुखरूप बाहेर काढले.
या बचाव कार्यात पिपल फॉर अ‍ॅनिमल्सचे अभिषेक गुजर, अमित बाकडे, सुमित जैन, कौस्तुभ गावंडे तसेच वर्धा वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी एस.एस. बनसोड, पुलगावचे क्षेत्र सहाय्यक एस.आर. परटक्के, वनरक्षक व्ही.बी. सोनवणे, व्ही.एम. हाडे, पी.बी. कानोजे, अभिषेक मुळे, पंकज भाकरे आदींनी सहकार्य केले. यावेळी ग्रामस्थांनी सहभाग घेतला.

Web Title: Lives of two Nilgaiians

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.