शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
3
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
4
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
5
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

जनार्धनच्या अवयवदानामुळे चौघांना जीवनदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 10:16 PM

तालुक्यातील किन्हाळा येथील शेतकरी जनार्धन बोबडे यांचा अपघाती मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबियांनी शेतकरी जनार्धन यांचे अवयवदान केल्याने चौघांना जीवनदान मिळाले आहे.

आॅनलाईन लोकमतसमुद्रपूर : तालुक्यातील किन्हाळा येथील शेतकरी जनार्धन बोबडे यांचा अपघाती मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबियांनी शेतकरी जनार्धन यांचे अवयवदान केल्याने चौघांना जीवनदान मिळाले आहे.जनार्धन यांनी संपूर्ण आयुष्य काळ्या आईच्या सेवेत अर्पण केले होते. पारंपारिक शेती करताकरताच आपले मरण आहे, हे त्यांना माहिती झाले होते. त्यांनी मध्यंतरीच्या काळात भाजीपाला शेती केली. वेळेप्रसंगी छोटा मोठा व्यवसायही त्यांनी केला. मागील काही वर्षामध्ये भाजीपाल्याच्या शेतीतून त्यांना चार पैसे मिळायला लागले होते. दरम्यान त्यांचा अपघाती मृत्यू झाला. बोबडे कुटुंबियानी त्यांचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतल्याने चौघांना जीवदान मिळाले.१४ फेब्रुवारीला शेतकरी जनार्धन हे दुचाकीने शेतातील भाजीपाला घेऊन हिंगणघाटच्या बाजारात गेले होते. परतीच्या प्रवासादरम्यान त्यांचा अपघात झाला. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना नागपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा बे्रन डेड झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या दु:खाच्या प्रसंगी मोठ्या हिमतीने जनार्धनचा मुलगा योगेश व बोबडे कुटुंबियानी जनार्धन यांच्या अवयवदानाचा निर्णय घेतला.हिंगणघाट येथील पर्व फाउंडेशनच्या मदतीने शनिवारी नागपूर येथून ग्रीन कॉरीडॉरमधून जनार्धन बोबडे यांचे अवयव गरजूंपर्यंत पोहचविण्यात आले. जनार्धन बोबडे यांचे हृदय आजपर्यंत केवळ शेतीच्या मशागतीसाठी धडधडले. हृदयदान केल्यामुळे त्यांचे हृदय आता चेन्नईला धडकणार असल्याचे सांगण्यात आले. त्यांचे हृदय चेन्नई येथील एका रुग्णाला देण्यात आल्याने त्या रुग्णाला जीवनदान मिळाले आहे. तर यकृत औरंगाबाद येथे नेण्यात आले. एक मुत्रपिंड नागपूर येथील व्होकार्टमधील रुग्णाला देण्यात आले आहे. अशाप्रकारे एका शेतकºयाच्या अवयवदानामुळे चार जणांना जीवनदान मिळाले असे म्हटल्यास वावगे ठरू नये.