विहिरीत अडकलेल्या बिबट्याला जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 22:07 IST2019-01-14T22:06:49+5:302019-01-14T22:07:07+5:30
नजीकच्या हिवरमठ या गावाजवळील सादबा दर्गाह भागातील विहिरीत पडलेल्या बिबट्याला वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करून बाहेर काढून जीवदान दिले.

विहिरीत अडकलेल्या बिबट्याला जीवदान
ठळक मुद्देशर्थीच्या प्रयत्नांना मिळाले यश
लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा (घा.) : नजीकच्या हिवरमठ या गावाजवळील सादबा दर्गाह भागातील विहिरीत पडलेल्या बिबट्याला वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करून बाहेर काढून जीवदान दिले.
विहिरीत बिबट असल्याचे निदर्शनास येताच वन विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. घटनास्थळी पोहोचलेल्या वन विभागाच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी परिसरातील नागरिकांच्या मदतीने रेस्कू मोहीम राबविली. त्यांच्या या मोहिमेला यशही आले. विहिरीबाहेर काढलेल्या या बिबट्याला वनविभागाच्या अधिकाºयांनी नागपूर येथे नेले. या घटनेची वार्ता परिसरात वाऱ्यासारखी पसरल्याने घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी झाली होती.