शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

१,३४२ मतदान केंद्रांवर राहणार सीसीटीव्ही कॅमेऱ्याची थेट 'वॉच'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2024 17:29 IST

विधानसभेचा वाजला बिगुल : जिल्हाधिकारी कार्यालयातून ५० टक्के केंद्रांतील हालचालींवर राहणार लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : विधानसभा निवडणूक जाहीर झाली असून, प्रशासनही कामाला लागले आहेत. प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. निवडणुका शांततेत पार पडाव्यात, यासाठी प्रशासन पूर्ण तयारीत असून मतदान केंद्रांवर कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडता कामा नये, याचीही दक्षता घेत आहे. त्यासाठी मतदान केंद्रांवर वेब कास्टिंगच्या माध्यमातून थेट नजर ठेवण्यात येणार आहे. 

जिल्हाधिकारी कार्यालयातून या सर्व केंद्रांवरील हालचालींवर बारीक नजर ठेवण्यात येईल. मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांवर कोणत्याही प्रकारची अनुचित घटना होणार नाही. संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे व शांततेत पार पाडण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासनावर आहे. त्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक तयारीही करण्यात आली आहे. मागील काही निवडणुकीत गोंधळ उडालेल्या मतदान केंद्रांचीही यादी तयार करीत येथे अधिक लक्ष देण्यात येणार आहे. मतदान केंद्रांच्या आतील सर्व हालचालींवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. 

त्यासाठी वेब कास्टिंगची मदत याही वेळी घेण्यात येणार आहे. लोकसभा निवडणुकीत याचा चांगला फायदा प्रशासनाला झाला होता. जिल्ह्यात चार मतदारसंघ असून १,३४२ मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत. 

सीसीटीव्ही लागणार मतदार केंद्रांबाहेरील हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही लावण्यात येणार आहेत.

संवेदनशील केंद्रावरही राहणार बारीक लक्ष मागील निवडणुकीत जी कैटे संवेदनशील होती. अशा केंद्रांवर बारीक लक्ष राहणार आहे.

मतदारसंघ          मतदान केंद्र आर्वी                       ३१० देवळी                      ३३५ हिंगणघाट                 ३५१  वर्धा                        ३४६

 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Electionनिवडणूक 2024wardha-acवर्धा