स्टार प्रवाहच्या ‘दुहेरी’ मालिकेतल्या कलाकारांसोबत सखींची थेट भेट

By Admin | Updated: June 20, 2016 02:00 IST2016-06-20T02:00:08+5:302016-06-20T02:00:08+5:30

लोकमत सखी मंच व स्टार प्रवाह वाहिनी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात सखींना ‘दुहेरी’

Live direct meeting with the stars of 'Star Streaming' duo series | स्टार प्रवाहच्या ‘दुहेरी’ मालिकेतल्या कलाकारांसोबत सखींची थेट भेट

स्टार प्रवाहच्या ‘दुहेरी’ मालिकेतल्या कलाकारांसोबत सखींची थेट भेट

‘वन मिनिट गेम शो’ मधून पैठणी जिंकण्याची संधी
वर्धा : लोकमत सखी मंच व स्टार प्रवाह वाहिनी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात सखींना ‘दुहेरी’ मालिकेच्याकलाकारांसह दिलखुलास गप्पा मारण्याची व थेट भेट घेण्याची संधी उपलब्ध करुन दिली आहे. यावेळी वन मिनिट गेम शोच्या माध्यमातून सखींना पैठणी जिंकण्याची नामी संधी चालुन आली आहे.
हा कार्यक्रम दि. २० जून ला सायंकाळी ५ वाजता, रंजन सभागृह, मातृसेवा संघ, वंजारी चौक, वर्धा येथे रंगणार आहे. यावेळी दुहेरी मालिकेचे कलाकार मालिकेचा खास भाग घेऊन येणार आहे. तसेच सखी मंच सदस्यांसोबत वन मिनिट गेम शोतून मनोरंजनाची धमाल रंगणार आहे. दुहेरी ही मालिका स्टार प्रवाह वाहिनीवर सोमवार ते शनिवार पर्यंत रात्री ८.३० वाजता प्रसारीत होत आहे. लहानपणापासूनच आपला भाऊराया आपल्या रक्षणासाठी पाठीशी उभा आहे, असे प्रत्येक बहिणीला वाटते; पण रक्षण करण्याची जबाबदारी फक्त भावाचीच आहे, असं नाही. किंबहुना वेळ पडली तर एक बहीण आपल्या बहिणीसाठी सर्वस्व पणाला लावू शकते, हाच विचार घेऊन स्टार प्रवाह सादर करीत आहे, एक नवा कौटुंबिक थरार ‘दुहेरी!’ ही कथा आहे, मैथिलीची. एका छोट्या गावात राहणारी तत्वनिष्ठ, प्रेमळ, साधी भोळी अशी मैथिली आपल्या बहिणीवर म्हणजे नेहावर जीवापाड प्रेम करते. नेहाच्या आनंदासाठी ती काहीही करू शकते. नेहाच्या रक्षणासाठी याच मैथिलीला बदलावी लागते तिची ओळख आणि ओलांडावी लागते गावाची वेस. ती नेमकं काय करते? पुढे काय घडतं या दोन बहिणींच्या आयुष्यात? याचा उलगडा या थरारक गोष्टीतून होईल.
या मालिकेच्या कलाकारांसोबत धमाल करण्यासाठी सखी मंच सदस्यांनी कार्यक्रमाला येण्याचे विसरू नका. कार्यक्रमात वन मिनिट गेम शो, कलाकारांसह गप्पा-टप्पा, मनोरंजन तसेच पैठणी जिंकण्याची सुवर्णसंधी आहे. अधिक माहितीकरिता व नाव नोंदणीसाठी लोकमत कार्यालय, ठाकरे मार्केट, वर्धा येथे किंवा ९७६७७०४१२५ या क्रमांकावर संपर्क करावा.(उपक्रम प्रतिनिधी)

Web Title: Live direct meeting with the stars of 'Star Streaming' duo series