नालवाडीच्या विश्ववास्तूमधून दारूसाठा जप्त

By Admin | Updated: October 21, 2014 22:56 IST2014-10-21T22:56:33+5:302014-10-21T22:56:33+5:30

शहरालगत असलेल्या नालवाडी येथील विश्ववास्तू अपार्टमेंटमध्ये दारूसाठा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीवरून सापळा रचून केलेल्या कारवाईत दोघांना अटक करण्यात आली.

The liquor seized from the world of Nalwadi | नालवाडीच्या विश्ववास्तूमधून दारूसाठा जप्त

नालवाडीच्या विश्ववास्तूमधून दारूसाठा जप्त

वर्धा: शहरालगत असलेल्या नालवाडी येथील विश्ववास्तू अपार्टमेंटमध्ये दारूसाठा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीवरून सापळा रचून केलेल्या कारवाईत दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्याजवळून दारूच्या २६ पेट्या जप्त करण्यात आल्या. ही कारवाई मंगळवारी पहाटे करण्यात आली. अटक केलेल्यांची नावे समीर बखरखॉ पठाण व केशव संगतानी असे असल्याचे पोलिसांनी सांगितले.
जिल्ह्यात दारूबंदी करण्याकरिता पोलीस अधीक्षकांनी तयार केलेल्या पथकाला नालवाडीत दारूसाठा असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून पथकाने नालवाडी परिसरात चौकशी केली असता येथील विश्ववास्तू आपर्टमेंटमध्ये दारूसाठा असल्याचे समोर आले. यावरून पोलिसांनी सापळा रचून आपार्अमेंटच्या खोली क्रमांक १०३ ची झडती घेतली असता तिथे मोठ्या प्रमाणात दारूसाठा मिळून आला. यात खोलीत १६ आणि बाहेर उभ्या असलेल्या एमएच ३१ बीबी ६०१७ क्रमांकाच्या वाहनात १० पेट्या असल्याचे समोर आले. हा दारूसाठा समीर बखरखॉ पठाण रा. स्टेशन फैल व केशव संगतानी रा. दयालनगर यांचा असल्याचे समोर आले. या दोघांनाही यावेळी अटक करण्यात आली. या कावाईत पोलिसांनी ५ लाख ७४ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक गजानन जाधव, प्रवीण लिंगाडे, एस. बी. मुल्ला, दहीलेकर, अशोक साबळे, जमादार नामदेव किटे, हरिदास काकड, वैभव कट्टोजवार, संतोष जयस्वाल, राजेश पचारे यांनी केली. (प्रतिनिधी)

Web Title: The liquor seized from the world of Nalwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.