दुचाकीसह दारू जप्त; एकाला अटक
By Admin | Updated: June 25, 2017 00:35 IST2017-06-25T00:35:07+5:302017-06-25T00:35:07+5:30
खापरी शिवारात नाकाबंदी करीत पोलिसांनी दुचाकीसह दारू जप्त केली. ही कारवाई शनिवारी करण्यात आली.

दुचाकीसह दारू जप्त; एकाला अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
सेलू : खापरी शिवारात नाकाबंदी करीत पोलिसांनी दुचाकीसह दारू जप्त केली. ही कारवाई शनिवारी करण्यात आली. यात ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त करीत एकास अटक करण्यात आली.
दुचाकीने दारू आणली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावरून खापरी शिवारात सापळा रचण्यात आला. दरम्यान, दुचाकी क्र. एमएच ३१ इएल ६१८६ ने युवक येताना दिसला. त्याला थांबवून स्कूल बॅग तपासली असता विदेशी दारू किंमत ९,६०० रुपये आढळून आली. यावरून दारू व दुचाकी असा ५९ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त कण्यात आला. यात आरोपी विकास पांडुरंग वानखेडे रा. रामनगर वार्ड याला अटक केली. याप्रकरणी आरोपीविरुध्द दारुबंदीच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार संजय बोथे यांच्या प्रत्यक्ष हजेरीत सेलू पोलीस ठाण्यातील कर्मचारी मेश्राम, काळे, तपासे यांनी केली.