शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
4
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
5
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
6
मतदानादरम्यान, किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
7
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
8
ना पत्नी, ना मुलबाळ! सलमान खानच्या पश्चात कोण होणार त्याच्या संपत्तीचा वारसदार? नाव आलं समोर
9
Baramati Lok Sabha Election 2024 : 'ही चिडचिड खूप काही सांगून जाते...', रोहित पवारांनी दत्तात्रय भरणेंचा व्हिडीओ केला शेअर, म्हणाले...
10
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
11
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
12
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
13
महाराष्ट्राची लढाई बारामतीत होते की काय? संजय राऊतांची मोदी-शाह यांच्यावर टीका
14
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
15
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
16
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!
17
"इंग्रजांनी उभारलेल्या व्यवस्थेला गंज लागलाय..," UPSCचा उल्लेख करत माजी RBI गव्हर्नरांनी उपस्थित केला प्रश्न
18
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
19
अजबच! गणितात २०० पैकी २१२, तर भाषेमध्ये २११ गुण, मुलीचं प्रगती पुस्तक होतंय व्हायरल  
20
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर

वर्ध्यातील तालुका भूमिअभिलेख कार्यालयात रंगते ओली पार्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2020 2:50 PM

Wardha news, party, liquor ban वर्धा तालुका भूमिअभिलेख कार्यालयातील काही कर्मचारी तसेच दलाल या कार्यालयातच दारू ढोसतात. हे मद्यशौकीन इतक्यावरच थांबत नाही तर ते दारू ढोसल्यावर दारूच्या रिकाम्या बाटल्या त्याच कार्यालयाच्या आवारात फेकुन देतात.

ठळक मुद्देप्रहारने पितळ पाडले उघडेकार्यालयाच्या आवारात दारूच्या बाटल्यांचा खच

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: स्थानिक सिव्हील लाईन भागातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात असलेल्या तालुका भूमिअभिलेख कार्यालयात ओल्या पार्ट्या रंगत असून मनसोक्त दारू ढोसल्यावर कार्यालयाच्या आवारात दारूच्या रिकाम्या बाटल्या टाकल्या जात असल्याने या कार्यालयातील प्रमुख्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, या मुख्य मागणीसाठी सोमवारी प्रहारच्यावतीने जिल्हाधिकारी यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.या आंदोलनामुळे जिल्हाधिकारी तसेच तालुका भूमिअभिलेख कार्यालयात एकच खळबळ उडाली होती. तालुका भूमिअभिलेख कार्यालयातील काही कर्मचारी तसेच दलाल या कार्यालयातच दारू ढोसतात. हे मद्यशौकीन इतक्यावरच थांबत नाही तर ते दारू ढोसल्यावर दारूच्या रिकाम्या बाटल्या त्याच कार्यालयाच्या आवारात फेकुन देतात. दारूबंदी जिल्हा म्हणून वध्यार्ची ओळख. परंतु, तालुका भूमिअभिलेख कार्यालयातील हा मनमर्जी कारभार जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिव्याखालील अंधार दाखविणाराच ठरत आहे.जिल्हा प्रशासनाच्या दुर्लक्षीत धोरणाचा परिचय देण्यासह बदनामीस कारणीभूत ठरत आहे. दारूबंदी जिल्ह्यातील जिल्हाकचेरीच्या आवारात रंगणाऱ्या ओल्या पार्ट्या दारूबंदीचे पितळ उघडे करीत आहे, असा आरोप यावेळी आंदोलनकर्त्यांनी करून चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांसह कर्मचाºयांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली. आंदोलनाचे नेतृत्त्व प्रहारचे जिल्हा प्रमुख विकास दांडगे यांनी केले. आंदोलनात राजेश सावरकर, महेंद्र डंभारे, नीतेश किनेकर, मंगेश मुळे, भुषण येलेकार, शुभम भोयर, प्रितम कातकिडे, ऋषिकेश पाचकवडे, शैलेश कोसे, विक्रम येलेकार, अभिषेक चौधरी, प्रफुल्ल वरठी, मुकेश वाघमारे, आदित्य कोकडवार, मंगेश मुडे यांच्यासह प्रहारचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी केली कानउघाडणीप्रहारच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन केले जात असल्याची माहिती मिळताच निवासी उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे यांनी त्यांचे दालन गाठून आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली. या चर्चेदरम्यान तालुका भूमिलेख अधिकारी भूजाडे, अधीक्षक पवार यांना पाचारण करण्यात आले. त्यानंतर हे अधिकारी निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या दालनात येताच सुनील कोरडे यांनी दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा विषय पुढे करून तालुका भूमिअभिलेख कार्यालयातील अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली. शिवाय २४ तासांत कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.जिल्हाधिकारीही झाले आश्चर्यचकीतकाही कामानिमित्त बाहेर असलेले जिल्हाधिकारी विवेक भीमनवार हे त्यांच्या कार्यालयात दुपारी १.४५ वाजताच्या सुमारास परत आले. अचाक आपल्या दालनासमोर दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा खच पाहून तेही आश्चर्यचकीत झाले. शिवाय हा प्रकार नेमका काय याची माहिती त्यांनी जाणून घेतली.

टॅग्स :liquor banदारूबंदी