दारुबंदी मंडळाने पकडली गावठी दारू
By Admin | Updated: October 16, 2014 23:29 IST2014-10-16T23:29:20+5:302014-10-16T23:29:20+5:30
नारा येथील दारूबंदी मंडळाच्या महिलांनी गावातील उक दारूविक्रेता दारूभट्टी लावण्याच्या तयारीत असताना त्याला पकडले. याची माहिती येथील बीट जमादाराला दिली असता त्याच्याकडून

दारुबंदी मंडळाने पकडली गावठी दारू
कारंजा (घाडगे): नारा येथील दारूबंदी मंडळाच्या महिलांनी गावातील उक दारूविक्रेता दारूभट्टी लावण्याच्या तयारीत असताना त्याला पकडले. याची माहिती येथील बीट जमादाराला दिली असता त्याच्याकडून मात्र कारवाई करण्याकरिता चालढकल करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, सावरडोह येथील झगडीपट्टा जंगलात नदीच्या काठावर गावठी दारू काढण्याच्या तयारीत असलेल्या दारुविक्रेत्यांवर पाळत ठेवून घटनास्थळावरुन चार क्किंटल मोहा सडवा, पकडला व नष्ट करून रुपचंद ठवळे, दिलीप आमझीरे यांचा बेत हाणून पाडला.
याची माहिती गावातील महिलांनी येथील बिट जमादाराला दिली; मात्र त्यांच्याकडून कारवाई करण्याम आली नाही. गावात गावठी दारू विक्री करणाऱ्या महिलेबद्दल बिट जमादार लोहकरे यांना माहिती दिली असता त्यांच्याकडून कारवाई करण्यात येत नसल्याचे तक्रारीत म्हटले आहे. ही कारवाई अध्यक्ष पदमा भिसे, पिगंला मनिराम मानेराव, नंदा भलावी, गिरजाबाई खिरटकर यांच्यासह सदस्यांनी केली. कारंजा शहरात दारूविक्री जोरात होत असून याकडे स्थानिक पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी आहे. (शहर प्रतिनिधी)