विजेच्या तारांना झाडांचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 23:45 IST2018-04-27T23:45:55+5:302018-04-27T23:45:55+5:30

गावात विद्यूत पुरवठा करणाऱ्या महावितरणच्या तारांना झाडांचा विळखा पडला आहे. वीज पुरवठा करणाºया तारा या झाडांमुळे एकमेकांना स्पर्श होत असल्याने पुरवठा खंडीत होत असल्याचे प्रकार घडत आहे.

 Lightning Seedling | विजेच्या तारांना झाडांचा विळखा

विजेच्या तारांना झाडांचा विळखा

ठळक मुद्देमहावितरणचे दुर्लक्ष : अपघात होण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्क
चिकणी (जामणी) : गावात विद्यूत पुरवठा करणाऱ्या महावितरणच्या तारांना झाडांचा विळखा पडला आहे. वीज पुरवठा करणाºया तारा या झाडांमुळे एकमेकांना स्पर्श होत असल्याने पुरवठा खंडीत होत असल्याचे प्रकार घडत आहे. यामुळे महावितरणने तारांवर चढलेली झाडे तोडून त्या तारा मोकळ्या कराव्या अशी मागणी होत आहे.
चिकणी गावालगतच प्रदीप भोयर व मनोज देशमुख यांचे शेत आहे. देशमुख यांच्या शेतात जाणाऱ्या विद्युत पुरवठ्याच्या तारा लोबंकळत असून तारांमध्ये झाडाच्या फांद्या गेल्या आहेत. त्याला वेलींचा विळखा बसला आहे. यामुळे केव्हाही तारांमध्ये घर्षण होवून आग लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. कुठल्याही प्रकारची दुर्घटना घडू नये याकरिता संबंधित विभागाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
ग्रामीण भागात वीज पुरवठा सुरू झाला त्याच काळापासून वीज तारा व तेच खांब आहेत. काही ठिकाणी तर पोल सुद्धा जीर्ण झाले आहे. काही ठिकाणच्या तारा नेहमीच तुटत असतात. चिकणी शिवारात देवळी पांदण रस्त्यावरून कृषी पंपाला विद्युत पूरवठा करणारी वीज वहिनी गेली आहे. ही वीज वाहिनी प्रदीप भोयर यांच्या शेतातून मनोज देशमुख यांच्या शेतात गेली आहे; परंतु भोयर व देशमुख यांच्या धुºयावरील झाडाच्या फांद्या तारांमध्ये गेल्याने येथे नेहमीच वीज पुरवठा खंडित होतो. या तारांच्या घर्षणामुळे केव्हाही आग लागून मोठी विपरीत घटना घडण्याची शक्यता बळावली आहे. यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी व ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे दिसून येते. या करिता सदर ग्रामपंचायतीने संबंधीत विभागाला याची माहिती दिली असून त्यांच्याकडून अद्यापपर्यंत कुठलीही कार्यवाही करण्यात आली नाही. यामुळे सबंधीत विभागाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. सदर तारांमधील फांद्या तोडून वीज तार मोकळ्या कराव्यात अशी मागणी चिकणी येथील शेतकऱ्यांची आहे.
शेतकऱ्यांनीही लक्ष देण्याची गरज
शेतात असलेल्या कृषी पंपाला विद्युत पूरवठा करणाऱ्या तारांना त्यांच्याच धुऱ्यावरील झाडांच्या फांद्यांचा वेढा पडल्याने पूरवठा वारंवार खंडीत होतो. यामुळे शेतकऱ्यांनी महावितरणकडून झाडे तोडण्याची प्रतीक्षा करण्यापेक्षा स्वत:च्या शेतातील झाडे तोडली तर विद्युत पूरवठा खंडीत होण्याच्या प्रकाराला आळा बसण्याची शक्यता आहे.

Web Title:  Lightning Seedling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :electricityवीज