माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी काढले पत्र
By Admin | Updated: July 29, 2016 02:05 IST2016-07-29T02:05:07+5:302016-07-29T02:05:07+5:30
जिल्हा परिषदेच्या शाळेत पाचवा आणि आठवा वर्ग सुरू करण्यावरून शासगी शाळांचा मुख्याध्यापक संघ व जिल्हा परिषदेत चांगलाच वाद सुरू आहे.

माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी काढले पत्र
प्राथमिक विभागाचे दुर्लक्ष : एका शाळेविरोधात पोलिसात तक्रार
वर्धा : जिल्हा परिषदेच्या शाळेत पाचवा आणि आठवा वर्ग सुरू करण्यावरून शासगी शाळांचा मुख्याध्यापक संघ व जिल्हा परिषदेत चांगलाच वाद सुरू आहे. अशात बुधवारी मुख्याध्यापक संघाच्यावतीने देवळी तालुक्यातील अडेगाव येथील शाळेविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. दरम्यान जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी शिक्षण उपसंचालकांच्या आदेशाचे उल्लंघन करू नये व शाळांत पाचवा आणि आठवा वर्ग सुरू करू नये, असे पत्र मुख्याध्यापकांना दिल्याची माहिती मुख्याध्यापक संघाने दिली आहे.
जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी मुख्याध्यापकांना पत्र दिले आहे; मात्र प्राथमिक विभागाच्यावतीने या संदर्भात कुठलीही कार्यवाही झाली नाही. प्राथमिक विभागाकडून शिक्षण उपसंचालकांच्या पत्राला केराची टोपली दाखवून या विभागाकडून त्यांचा अवमान केल्याचा आरोप मुख्याध्यापक संघाच्यावतीने करण्यात आला आहे. बुधवारी देवळी पोलिसात करण्यात आलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी मुख्याध्यापक संघाच्यावतीने करण्यात आली आहे. पोलिसांच्या तपासात काय ते सत्य उघड होणार असून याकडे शिक्षणक्षेत्राचे लक्ष लागले आहे.(प्रतिनिधी)