सर्वांनी मिळून गावाचा विकास करू
By Admin | Updated: February 1, 2016 02:06 IST2016-02-01T02:06:05+5:302016-02-01T02:06:05+5:30
आमदार आदर्श ग्राम योजनेत सालोड या गावाची निवड केले, हे अभिनंदनीय आहे.

सर्वांनी मिळून गावाचा विकास करू
रामदास तडस : आमदार आदर्श ग्राम योजनेचा शुभारंभ
वर्धा : आमदार आदर्श ग्राम योजनेत सालोड या गावाची निवड केले, हे अभिनंदनीय आहे. खासदार आदर्श गावाबद्दल अनुभव कथन करीत सर्वांनी मिळून सालोड गावाचा विकास करू, अशी ग्वाही खासदार रामदास तडस यांनी दिली.
सालोड (हिरापूर) येथील ग्रा.पं. प्रांगणात आमदार आदर्श ग्राम योजनेचे उद्घाटन खा. तडस यांच्या अध्यक्षतेत करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. उद्घाटक म्हणून आ.डॉ. पंकज भोयर तर अतिथी म्हणून एमगिरीचे संचालक डॉ. प्रफुल काळे, जि.प. उपाध्यक्ष विलास कांबळे, जिल्हा नियोजन अधिकारी प्रकाश डायरे, तहसीलदार राहुल सारंग, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर भारती, सरपंच गीता झाडे, लेखा अधिकारी प्रतापराज मासाळ, ग्रा.पं. सदस्य उपस्थित होते.
डॉ. काळे यांनी कौशल्य विकासावर आधारित लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे आवाहन केले. कांबळे यांनी सर्कलमधील या गावात विविध कामे केली. आणखी काही कामे पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. आॅ.डॉ. भोयर यांनी दारूबंदी करावी. विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणात लागणारी मदत मिळवून देऊ, प्रशासकीय कामांसाठी लागणारे प्रमाणपत्र त्वरित मिळवून देऊ. ग्रामस्थांच्या सहकार्याने आदर्श ग्राम करू, असे सांगितले.
प्रास्ताविक आशिष कुचेवार तर संचालन रंजना वानखेडे यांनी केले. यावेळी नरेश धोटे, सी.एम. कुटे, डॉ. नाडे, हेमंत देवतळे, राऊत, आर.एन. तेलरांधे, शैलेश देशमुख आदी उपस्थित होते.(कार्यालय प्रतिनिधी)