आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रम : जिल्हा प्रशासनातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचाही सहभाग लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : जिल्हा प्रशासन व पतंजली योग समिती यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी जिल्हा क्रीडा संकूल येथे सकाळी ६ वाजता योग दिन कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी खा. रामदास तडस, जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्यासह अधिकारी, कर्मचाऱ्यांनी योगाचे धडे गिरविले. योग दिन कार्यक्रमाला खा. तडस यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून प्रारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी शैलेश नवाल, क्रीडा अधिकारी नितीन तारळकर, निवासी उपजिल्हाधिकारी मंगेश जोशी, उपजिल्हाधिकारी एन.के. लोनकर, पतंजली योग समितीचे अध्यक्ष दामोधर राऊत, भारत स्वाभिमान न्यासचे संयोजक अरविंद वंजारी, पतंजली युवा भारतचे मोहन काळे, किसान पंचायतचे अध्यक्ष प्रशांत सावरकर, महिला पतंजली योग समितीच्या अध्यक्ष सरिता बोंगाडे, भारत स्वाभिमान न्यासच्या महामंत्री वनिता चलाख आदी उपस्थित होते.
खासदार, जिल्हाधिकाऱ्यांनी गिरविले योगाचे धडे
By admin | Updated: June 22, 2017 00:30 IST