जखाळा शिवारात बिबट्याचा वावर
By Admin | Updated: May 15, 2014 01:47 IST2014-05-15T01:47:35+5:302014-05-15T01:47:35+5:30
पाण्याच्या शोधात उन्हाळ्यात वन्यप्राणी गाव शिवारांकडे कुच करतात. सध्या जखाळा शिवारात बिबट्याचा वावर असल्याचे समोर आले आहे.

जखाळा शिवारात बिबट्याचा वावर
ग्रामस्थांत भीती : पायाचे ठसे आढळले
घोराड : पाण्याच्या शोधात उन्हाळ्यात वन्यप्राणी गाव शिवारांकडे कुच करतात. सध्या जखाळा शिवारात बिबट्याचा वावर असल्याचे समोर आले आहे. यामुळे शेतकर्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
जखाळा मौजा हा बारमाही ओलिताची शेती असणारा व केळीच्या बागांचा भाग समजला जातो. या मौज्यापासून जंगल दूर असले तरी येथे थंडावा कायम असतो. दोन दिवसांपूर्वी एका शेळीला ठार मारण्याचा प्रकार येथे घडला. या घटनेचा मागोवा घेण्यात आला असता काही प्राण्यांच्या पायाचे ठसे आढळून आले. या शिवारात वन्यजीव प्रेमी घनश्याम माहुरे यांचे शेत आहे. त्यांनी ठशांचे अवलोकन केले असता सदर ठसे बिबटाच्या पायाचे असल्याचे निष्पन्न झाले.
मागील वर्षीही उन्हाळ्यात याच मौजात सातबहिणीचा नाला या भागात बिबट्याचा वावर होता. त्यावेळीही एका शेतकर्याच्या गायीचा फडशा पाडला होता. दरवर्षी उन्हाळ्याच्या तप्त वातावरणापासून बचाव करण्याकरिता व पाण्याच्या शोधात वन्यप्राणी गावशिवाराकडे येत असल्याचा अनुभव ग्रामस्थांना आहे. सध्या बिबट्याच्या पायाचे ठसे दिसून आल्याने शेतकरी धास्तावले आहे. वनिभागाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. सध्या परिसरातील शेतकर्यांत भीतीचे वातावरण आहे.(वार्ताहर)
■ जखाळा शिवारामध्ये दोन दिवसांपूर्वीएका बकरीचा फडशा पाडला. घटनास्थळावर आढळलेले पायाचे ठसे बिबट्याचे असल्याचे निष्पन्न झाले आहे.
■ परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे कळताच शेतकर्यांमध्ये भीती पसरली.