शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
3
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
4
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
5
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
6
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
7
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
8
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
9
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
10
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
11
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
12
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
13
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
14
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
15
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
16
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
17
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
18
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
19
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
20
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले

वर्धा जिल्ह्यात बिबट्याच्या बछड्याची मातेपासून ताटातूट; उपचारानंतर सोडणार जंगलात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 5:22 PM

वर्धा जिल्ह्यातील आकोलीच्या हिंगणी वनपरिक्षेत्रात असलेल्या मदनी बिटात आज दुपारी एक बिबट्याचा बछडा आपल्या मातेपासून दुरावला.

ठळक मुद्देजमावाच्या गोंगाटाने झाली गडबडदोन दिवसांनंतर जंगलात सोडण्यात येईल

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: वर्धा जिल्ह्यातील आकोलीच्या हिंगणी वनपरिक्षेत्रात असलेल्या मदनी बिटात आज दुपारी एक बिबट्याचा बछडा आपल्या मातेपासून दुरावला. त्याला सध्या पीपल्स फॉर अ‍ॅनिमल्सच्या कार्यकर्त्यांच्या सुपूर्द करण्यात आले असून, या बछड्याच्या पायाला झालेल्या जखमेवर उपचार करून त्याला पुन्हा जंगलात सोडण्यात येणार आहे.हिंगणी वनपरिक्षेत्राच्या अंतर्गत येणाऱ्या शंकररराव दिघडे यांच्या उसाच्या शेतात या बछड्याची आई व अजून एक बछडा निघून गेले आहेत. या भागात काही युवक मासेमारी करण्यासाठी धरणाच्या दिशेने जात असताना त्यांंना धुऱ्यावर बसलेली मादी बिबट व तिचे दोन बछडे दिसले. त्यांनी गावकऱ्यांना ही माहिती कळवताच, शेकडो गावकरी तेथे गोळा झाले. त्यांच्या आवाजाने ही मादी व तिचे दोन बछडे गोंधळून जाऊन उसाच्या शेतात शिरण्यासाठी निघाले. तीत एक बछडा त्याच्या पायाला जखम असल्याने जवळच्या झाडीत दडला. तर मादी बिबट व दुसरा बछडा उसाच्या शेतात शिरले.झाडीत शिरलेल्या बछड्याला पहायला गावकऱ्यांनी एकच गर्दी केली. यावेळी हिंगणी वनपरिक्षेत्राचे अधिकारी पी.एस. पाडे यांनी जमावाला पांगवले. या बछड्याची तपासणी केली असता त्याच्या पायाला जखम झाल्याचे आढळून आले. त्याला उपचारासाठी पीपल्स फॉर अ‍ॅनिमल्सच्या सुपूर्द केले असून दोन दिवस त्याच्यावर उपचार केले जातील. त्यानंतर त्याला त्याच्या मातेजवळ सोडले जाईल.मादी बिबटचा तात्काळ प्रतिसादगावकऱ्यांना आपल्या भोवती गोळा झालेले पाहून हा बछडा जेव्हा जेव्हा डरकाळी फोडायचा तेव्हा तेव्हा जवळपासच दडलेली त्याची आई त्याला प्रत्युत्तर देत होती.

टॅग्स :leopardबिबट्या