‘बाबासाहेब सर्वांचे’ विषयावर मिटकरी यांचे व्याख्यान
By Admin | Updated: April 24, 2016 02:21 IST2016-04-24T02:21:11+5:302016-04-24T02:21:11+5:30
डॉ. आंबेडकर उत्सव समिती, मराठा सेवा संघ, आर्वी तालुक्याच्या वतीने गुरुवारी स्थानिक भारतरत्न राजीव गांधी स्टेडीयम ...

‘बाबासाहेब सर्वांचे’ विषयावर मिटकरी यांचे व्याख्यान
आर्र्वी : डॉ. आंबेडकर उत्सव समिती, मराठा सेवा संघ, आर्वी तालुक्याच्या वतीने गुरुवारी स्थानिक भारतरत्न राजीव गांधी स्टेडीयम येथे ‘बाबासाहेब सर्वांचे’ या विषयावर अमोल मिटकरी यांचे व्याख्यान आयोजित आहे. विश्रामगृहात शुक्रवारी झालेल्या पत्रकारपरिषदेत ही माहिती देण्यात आली.
समाजाला वैचारिक परिवर्तनाची दिशा देणाऱ्या डॉ. आंबेडकरांचे विचार सर्व समाजापर्यंत पोहचविण्यासाठी या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मराठा सेवा संघाचे विरेंद्र कडू यांनी यावेळी दिली. बौद्ध महासभेचे मुख्य संयोजक राजेंद्र नाखले यांनी या कार्यक्रमाविषयीची भूमिका विषद केली. या आयोजनात पहिल्यांदाच आर्वी शहर व तालुक्यातील सर्व सामाजिक संघटनाना सहभागी करून घेतल्याचे आयोजकांच्यावतीने प्रशांत ढवळे यांनी सांगितले. सोबतच इतरही माहिती देण्यात आली.
व्याख्यानानंतर सांस्कृतिक प्रबोधनाचा कार्यक्रम घेणार असल्याचेही सांगण्यात आले. यावेळी शेतकरी कामगार समितीचे अध्यक्ष रूपचंद टोपले, प्रा. रवींद्र दारूंडे, प्रा. पंकज वाघमारे, मधू सोमकुंवर, राजू डंभारे, प्रशांत एकापूरे, प्रा.सुधाकर भूयार, जी. बी. कटकतलवारे, प्रफुल मनवर उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)