पहिली ते आठवीपर्यंतचे शिक्षण होणार आनंददायी
By Admin | Updated: June 2, 2014 01:38 IST2014-06-02T01:38:07+5:302014-06-02T01:38:07+5:30
शालेय शिक्षणाची गोडी निर्माण होण्यासोबतच पाठय़पुस्तकातील धडे

पहिली ते आठवीपर्यंतचे शिक्षण होणार आनंददायी
विरूळ (आकाजी) : शालेय शिक्षणाची गोडी निर्माण होण्यासोबतच पाठय़पुस्तकातील धडे लगेचच अवगत होण्याच्या दृष्टिकोनातून शालेय अभ्यासक्रमातील पहिली ते आठवी पर्यंत सर्व पुस्तके ई-बुक्स स्वरुपात प्रकाशित करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. महाराष्ट्र राज्य पाठय़पुस्तक संशोधन आणि निर्मिती मंडळाच्या बालभारतीच्या अभ्यासक्रमात यावर्षी ई-तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. पहिली ते आठवीपर्यंत शिक्षण आनंददायी होणार आहे. सध्या आरटीई व आरटीआय या नियमांची अंमलबजावणी शिक्षण विभागात सुरू आहे. या अंतर्गत शिक्षकांना विविध प्रकारची प्रशिक्षणे देण्यात येत आहे. अध्ययन व अध्यापन प्रक्रिया प्रभावी होण्यासाठी ई-स्कूलची निर्मिती करण्यात आली. राज्यातील काही जिल्ह्यातील शाळांमध्ये ई-स्कूलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ज्ञानदान केले जात आहे. बदललेल्या नवीन अभ्यासक्रमानुसार तयार करण्यात आलेल्या पाठय़पुस्तकातील अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना अवगत व्हावा. यासाठी पाठांना पूरक अशा ध्वनी चित्रफिती देण्यात आल्या आहेत. पुस्तकातील कथा अँनिमेशनमध्ये रूपांतरित करण्यात येणार आहे.(वार्ताहर)