मारेकऱ्यांची रेखाचित्रे जिल्हाभर लावा
By Admin | Updated: June 22, 2016 02:00 IST2016-06-22T02:00:40+5:302016-06-22T02:00:40+5:30
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोळकर व कॉम्रेड डॉ. गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांची रेखाचित्रे जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनमध्ये ...

मारेकऱ्यांची रेखाचित्रे जिल्हाभर लावा
महाराष्ट्र अंनिसची मागणी : पोलीस अधीक्षकांना निवेदन सादर
वर्धा : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोळकर व कॉम्रेड डॉ. गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांची रेखाचित्रे जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनमध्ये तसेच मोक्याच्या आणि वर्दळीच्या ठिकाणी लावावी, अशी मागणी जिल्हा पोलीस अधीक्षकांना महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली.
सनातन संस्थेचे चार साधक सारंग अकोलेकर, प्रवीण निंबकर, रुद्र पाटील, जयप्रकाश हेडगे हे या हात्येत सहभागी असल्याचा सीबीआयला संशय आहे. त्यामुळे या संशयित आरोपीची छायाचित्रेही पोलीस अधीक्षक अंकीत गोयल यांना देण्यात आली. इंटरपोलच्या रेडकॉर्नर नोटीस असलेले सदर चारही इसम मडगाव बॉम्बस्फोटात सहभागी होते. सदर आरोपी सीबीआयला मिळाले तर मडगाव बॉम्ब स्फोटासह डॉ. दाभोळकर, डॉ. पानसरे, डॉ. कलबुर्गी यांच्या हत्येचा तिढा सुटणार आहे. तसेच सनातन संस्था, हिंदु जनजागृती या दोन्ही धर्मवादी संघटनांवर बंदी घालण्यास यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या यावेळी शिष्टमंडळात राज्यसरचिटणीस गजेंद्र सुरकार, प्रकाश कांबळे, भरत कोकावार, सुनील ढाले, नरेंद्र कांबळे, भीमसेन गोटे आदीचा सहभाग होता.
या गंभीर घटनेने संपूर्ण महाराष्ट्र पोळून निघाला आहे. या संदर्भात आवश्यक ती पावले उचण्यात येतील, असे आश्वासन यावेळी गोयल यांनी दिले.(शहर प्रतिनिधी)