आर्थिक विवंचनेत झाले शेतकऱ्यांचे लक्ष्मीपूजन
By Admin | Updated: October 25, 2014 01:40 IST2014-10-25T01:40:48+5:302014-10-25T01:40:48+5:30
सोयाबीनचा दाणा घरी नाही, कापसाचे आगमन झाले नाही, अशातच आलेल्या सणाला शेतकरी सामोरे गेले.

आर्थिक विवंचनेत झाले शेतकऱ्यांचे लक्ष्मीपूजन
घोराड : सोयाबीनचा दाणा घरी नाही, कापसाचे आगमन झाले नाही, अशातच आलेल्या सणाला शेतकरी सामोरे गेले. या दिवसाला आनंद साजरा करण्यात आला नसला भाऊबिजेला बहीन घरी येणार याचा आनंद भावाला आहे. बहीन घरी आल्यावरच भाऊबीजेनंतर दिवाळी साजरी साजरी करू अशी अशा शेतकरीर ठवून आहे. या दिवसापर्यंत शेतातील काही उत्पन्न घरी येईल, ते बाजाराज काढून दिवाळी साजरी करण्याची भाषा बळीराजा बोलत आहे.
लक्ष्मीपुजनाला केवळ नैवैद्यासाठी सण साजरा करण्यात आला़ लांबलचक अंगणात व दाराच्या दोन्ही बाजूला लावल्या जाणाऱ्या दिव्यांची आरास यंदाच्या दिवाळीत तेलात कापसाची वात भिजवून नावापुरता प्रकाश जरी दिसला तरी प्रकाशाचे पर्व साजरे झाल्याचा आनंद साऱ्यांनी घेतला़ पण विवंचना कायम होती़ दिवाळी हा आर्थिक उलाढालाची सण. शेतकरी दरवर्षी पांढऱ्या सोन्याच्या भरवशावर हा सण साजरा करतो. पण उशिरा झालेल्या दुबार तिबार पेरणीमुळे बहुतांश शेतकऱ्यांच्या शेतात शितदहीच्या कापूस वेचणीला प्रारंभ झाला नाही़
सततच्या नापिकीत दसरा झाला, धनत्रोयदशीला सोने खरेदी करतात एक तरी सोन्याचा मणी घ्यावा ही आशा तर पूर्ण झालीच नाही, उलट सुवर्ण तारण घेवून बहुतांश शेतकऱ्यांना दिवाळी सणाला सामोरे जावे लागते आहे़ भाऊबीजेपासून आर्थिक उलाढालीला वेग येतो़ दिवाळी दिवाळ काढणारी आहे, असे बोलले जात असले तरी भाऊबीज हा दिवाळीतील सर्वसामान्यापासून ते श्रीमंतापर्यंत आपापल्यापरीने खर्च करणारा सण आहे़
या दिवसापासून बाजारपेठेत गर्दीला सुरुवात होते़ कापड व स्टील भांड्याच्या दुकानात आर्थिक व्यवहाराला चालना मिळत असताना किराणादुकान मधून मालाची उचल होते़ बहीण, जावई, भाचा, भाची यासमवेत होणारा हा सण पाहुणचारासहित देवाण घेवाणीचा असतो़ शेतकऱ्यांनी उचलेले बँकेचे कर्ज नापिकीमुळे कसे चुकवावे या विवंचनेत असलेले शेतकरी आता दिवाळी सणाला सामोरे गेले असून यावर्षीची भाऊबीज आणि बहीण एकमेकांचा आर्थिक बाजू समजावून घेवून साजरी करण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे़ यातही व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची होणारी लूट येथे कायम राहणार असल्याची भीती आहे. (वार्ताहर)