धामणगावात सोयाबीन खरेदीचा शुभारंभ
By Admin | Updated: October 20, 2014 23:17 IST2014-10-20T23:17:14+5:302014-10-20T23:17:14+5:30
धामणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज बाजारच्या आवारात सभापती श्रीकांत गावंडे यांच्या हस्ते सोयाबीन खरेदीचा शुभारंभ रविवारी करण्यात आला.

धामणगावात सोयाबीन खरेदीचा शुभारंभ
धामणगाव रेल्वे : धामणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज बाजारच्या आवारात सभापती श्रीकांत गावंडे यांच्या हस्ते सोयाबीन खरेदीचा शुभारंभ रविवारी करण्यात आला.
बाभुळगाव तालुक्यातील फाळेगाव येथील भाष्करराव मकेश्वर या शेतकऱ्याच्या सोयाबीनला पहिल्याच दिवशी ३ हजार १११ रूपये भाव देण्यात आले़ संपूर्ण विदर्भात ख्यातीप्राप्त असलेल्या धामणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत वर्धा, यवतमाळ व अमरावती आदी जिल्ह्यातील शेतकरी आपला शेतमाल विक्रीकरिता नेहमीच आणतात. शेतकऱ्यांना पाच रूपयांत भोजन नगदी चुकारा व सुसज्ज बाजार आवार असल्याने शेतकरी या बाजार समितीत माल विक्र ीस आणतात़ यंदा धनश्री ट्रेडिंग कंपनी या खरेदीदाराने सोयाबीन खरेदी केले तर सोयाबीनचा लिलाव अडते लक्ष्मीनारायण पनपालिया यांनी केला़ सभापती श्रीकांत गावंडे यांच्याहस्ते विधिवत वजन काट्याचे पूजन करण्यात आले. यंदा सोयाबीनच्या पिकांची अवस्था फारच खराब आहे. सोयाबीनची भरण झालेली नाही़ यावर्षी एकरी दोन ते तीन क्विंटल उत्पादन मिळण्याची शक्यता आहे़ त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्चसुध्दा मिळणे अशक्य आहे़
अशा परिस्थितीत केंद्र सरकार व राज्य सरकारने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना एकरी पाच हजार रूपयांची सरसकट मदत करावी, जेणेकरून उत्पादन खर्च तरी निघेल़, अशी मागणी श्रीकांत गावंडे यांनी शेतकऱ्यांच्यावतीने व्यक्त केली़