हिंगणघाट येथे ‘नो-व्हेईकल डे’ चा शुभारंभ
By Admin | Updated: February 5, 2016 01:38 IST2016-02-05T01:38:44+5:302016-02-05T01:38:44+5:30
वाढत्या प्रदूषणावर आळा घालण्याकरिता जनमानसात जागृती व्हावी म्हणून गुरुवारी सकाळी ९ वाजता गोकुलधाम मैदानावरून रॅली काढण्यात आली.

हिंगणघाट येथे ‘नो-व्हेईकल डे’ चा शुभारंभ
हिंगणघाट : वाढत्या प्रदूषणावर आळा घालण्याकरिता जनमानसात जागृती व्हावी म्हणून गुरुवारी सकाळी ९ वाजता गोकुलधाम मैदानावरून रॅली काढण्यात आली. ही रॅली शहरातील प्रमुख मार्गाने फिरत त्याच मैदानावर विसर्जित झाली. आठवड्याच्या प्रत्येक गुरूवारी ‘नो व्हेईकल डे’ पाळण्याचा संकल्प जनसामान्यापर्यंत पोहोचविण्याकरिता निघालेल्या या रॅलीत अनेक नागरिक स्वयंस्फूर्त सहभागी झाले.
जगात सर्वत्र प्रदूषणाची समस्या उग्ररूप धारण करीत आहे. यावर पर्यावरणाचा समतोल साधण्याची गरज आहे. यातूनच त्याववर आळा घालणे शक्य असल्याची गरज व्यक्त होत आहे. ही बाब केवळ कागदोपत्री न राहता प्रत्यक्षात कृतीत यावी व नागरिकांना पर्यावरणाचे महत्त्व समजावे म्हणून जनजागृती आवश्यक आहे. सोबतच मोठ्या प्रमाणात प्रदूषण करणाऱ्या डिझेल पेट्रोलवर चालणारी वाहने नागरिकांनी केवळ आवश्यक वेळीच वापरून अनावश्यक वापर टाळावा. यातून पैश्याची बचत व आरोग्याचा लाभ याची जाणीव ठेवून ‘नो व्हेईकल डे’ च्या उपक्रमात नागरिकांनी सहभाग नोंदविला.
हिंगणघाट येथे नगराध्यक्षाचा सहभाग
हिंगणघाट : ‘नो व्हेईकल डे’च्या उपक्रमात बाजार समिती सभापती तथा नगराध्यक्ष अॅड. सुधीर कोठारी, न.प. मुख्याधिकारी अनिल जगताप, तहसीलदार दीपक कारंडे, नायब तहसीलदार अरविंद हिंगे, लोमा खोडे, नगरसेवक सौरभ तिमांडे, प्रोफेशनल टिचर्स असोसिएशनचे विभागीय अध्यक्ष सुनील पिंपळकर, जिल्हा अध्यक्ष गणेश मुंगले, अॅड. इब्राहिम बख्श, प्रदीप नागपूरकर, सुनील डोंगरे, अन्न पुरवठा निरीक्षक गजानन टेकाडे, रूपेश लाजुरकर, तुषार हवाईकर, लता बेलेकर, किरण गहेरवार, कैलास घोडे, प्रवीण मुजबैले, पंकज भोंगाडे, राजू चौधरी, प्रभाकर मुंगले, शशिकांत डुंबरे, निलेश हाडके, चंद्रकांत ननंदकर, शेख इमाम, शुभम भजभुजे, रितेश पोकळे, कांचन ननंदकर, जगदीश वांदिले, उमेश राऊत, अनिल झाडे, हनुमान मुडे, प्रशांत भेदुरकर, स्वप्नील बाराहाते, प्रफुल्ल मेश्राम, प्रशांत इचवे, प्रवीण सातपुते, रेणुका दवंडे, कविता व्यास, शिवांजली आभाळे, अश्विनी ढेकले, सोनाली मुजबैले, शिल्पा चन्ने, निखील थूल, प्रमोद कुंभारे, अरुण घोटेकर, प्रीतम कुंभारे, श्रीधर खैर, श्याम गावंडे, प्रमोद माथनकर, अरविंद बडे, अजय धोटे, यशवंत गडवार, संजय वंजारी, राम खोकले, राजेश हिंगमिरे आदींसह शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थीही सहभागी होते. ‘नो व्हेईलकल डे’ च्या पुढच्या गुरूवारी या मोहिमेमध्ये अनेकांनी सहभागी होण्याचा मानस व्यक्त केला.
ही रॅली गोकुलधाम मैदानावरून महाविर भवन चौक, डॉ. आंबेडकर चौक, विठोबा चौक मार्गे सुभाष चौक़, कारंजा चौक, तुकडोजी पुतळ्यापासून गोकुलधाम मैदानावर परत आली.(तालुका प्रतिनिधी)